नाशिक : राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा १७ जूनपासून

नाशिक : नाशिक जिल्हा ब्रिज संघटना व मित्राविहार क्लब नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ७वी तोलानी चषक राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित करण्यावर आली आहे. नाशिक इंजिनीअरिंग कल्स्टर एमआयडीसी अंबड नाशिक येथे दि . १७ ते २१ जून दरम्यान ही स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी सांघिक व पेअर्स असे प्रकार असून स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. तोलानी चषक दिले जाणार आहे.

या स्पर्धेतून ऑस्ट्रेलियात २०१८ ( १४ ते १८ फेब्रुवारी) मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीकरीता उपांत्य फेरीसाठी विजेत्या संघांना प्रवेश दिला जाणार आहे. तर उपविजेते संघ निवडचाचणी साठी पात्र ठरतील. अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव हेमंत पांडे यांनी दिली. या स्पर्धेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया याचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या स्पर्धेचे उदघाट्न स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप व्यवस्थापक सुधीर भागवत, ब्रिज फेडरेशनचे उपाध्यक्ष के.के.भोसले, सचिव आनंद सामंत, नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मोहन उकिडवे, मित्रविहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती आयोजन समिती सचिव सूर्या रेडडी यांनी दिली.

ब्रिज खेळाला एशियन गेम्स मध्ये प्रवेश मिळाला असल्याने या स्पर्धेत चुरस तसेच चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा डॉ. अतुल दशपुत्रे व सुनील पत्की यांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्हा संघटनेने यापूर्वी राष्टीय व राज्य स्पर्धेचे आयोजन केलेले असल्याने जिल्हा संघटनेस कनिष्ठ व उपकनिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याची संधी मिळाली होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.