Nashik Mayor भाजप, शिवसेना, कॉंग्रेसमधून ‘या’ नगरसेवकांनी भरले अर्ज

नाशिक महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाला अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत  भाजपा पक्षश्रेष्ठींना एकाच  नावावर शिक्कामोर्तब करता आले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने आज एकच अर्ज न भरता तीन अर्ज महापौर तर चार अर्ज उपमहापौर दाखल केले आहेत. (Nashik Mayor)

या मध्ये दिनकर आढाव, शशिकांत जाधव, सतीश कुलकर्णी, भिकुबाई बागुल, गणेश गिते यांनी अर्ज दाखल केले. सोबतच उपमहापौर पदासाठी गणेश गिते, अलका आहेर, अरुण पवार, भिकुबाई बागुल यांनी अर्ज  दाखल केले आहेत.भाजपचे अर्ज दाखल करताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार ऍड. राहुल ढिकले, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील उपस्थित होते.

तर शिवसेना देखील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत येऊन स्वतःचा उमेदवार देत आहे. यात आज शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर , विलास शिंदे यांनी महापौर पदासाठी सोबतच  उपमहापौर पदासाठी विलास शिंदे यांचा एकमेव अर्ज आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेसने सुद्धा खेळी केली असून, कॉंग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राहुल दिवे यांचा महापौरपदासाठी तर शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुफी जीन यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.सभागृहात भाजपकडे पुरेसे संख्याबळ असले तरीही या पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेना जोरदार  प्रयत्न करत असून, भाजपच्या सहलीस प्रारंभी १७ नगरसेवकांनी दांडी मारली.

यापैकी नऊ नगरसेवकांनी प्रकृती आणि खासगी महत्वाच्या कामांमुळे सहभागी होणार नाही असे कळवले होते. मात्र आता भाजपने पक्षाच्या सर्वच सदस्यांना व्हिप बजावला आहे. गिरीश महाजन यांनी गोव्याला नगरसेवकांची बैठक घेत प्रत्येक नगरसेवकाकडून महापौर कोण असावा याविषयीची चाचपणी केली.

त्यातून चौघा नगरसेवकांची नावे यांचे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये भाजपला सर्वात मोठा फटका हा माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा बसणार आहे. यामध्ये सानप यांची उमेदवारी भाजपने कापली होती, त्यामुळे सानप यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करत निवडणूक लढवली व ते पराभूत झाले आहेत.

मात्र यावर आता सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सानप यांचे समर्थक नगरसेवक फुटण्याची भीती आहे. यामध्ये जवळपास ७ नगरसेवक फुटतील अशी भीती असल्याने भाजपा मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहे. (Nashik Mayor)

प्रिय वाचक तुम्हाला नाशिकच्या बातम्या हव्या आहेत. तेव्हा आमच्या Whats App Group मध्ये नक्की सहभागी व्हा ! या ग्रुपचे सेटिंग Only Admin केले आहे. नक्की सहभागी व्हा असे आम्ही आवाहन करतो. खालील लिंक क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/DQYevmRJrMF0SYUiMmEw7U
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.