नाशिक : शहरातील त्र्यंबकेश्वर रस्त्यावर स्थित महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 118 जण कोरोना बाधित झाले आहेत. यात पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. Nashik Police Training Corona
महाराष्ट्र पोलीस एकेडमीत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी दिले जाते. या बॅच मधील सर्व कोरोना बाधित प्रशिक्षणार्थींना नाशिकच्या ठक्कर डोम कोव्हिडं सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेने नाशिक जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले असून सर्वत्र काळजी घेण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत. नाशिक शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. एक दिवसापूर्वी तीन महिन्याचे बाळ कोरोनाने दगावल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. आणि आज गुरुवारी ही पोलीस प्रशिक्षण केंद्रातील घटनेने जिल्हा प्रशासनाने जास्त खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे. Nashik Police Training Corona