लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सभा ८ कोटी उत्पन्न

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा नावलौकिक वाढविण्यास संचालक मंडळ कटिबध्द असुन, ८ कोटी ५७ लाख ३८ हजार ५६८ रुपयांचे उत्पन्न मिळाला आहे.शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला भाव मिळावा या करीता शासनदरबारी  सतत प्रयत्न केले जातील तसेच  बाजार समितीच्या कामकाजात कोणत्याही घटकांच्या मागण्यांसाठी चर्चेतून समन्वय साधून लिलाव बंद राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल असे प्रतिपादन बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभात सभापती जयदत्त होळकर यांनी केले .
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनीवारी दुपारी सभापती जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती सुभाष कराड, सदस्य पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, अशोक गवळी, ललित दरेकर, रमेश पालवे,  सचिनकुमार ब्रम्हेचा , सौ.प्रिती नवनाथ बोरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी बाजार समितीस ८ कोटी ५७ लाख ३८ हजार ५६८.१९  रुपयांचे उत्पन्न मिळाला तर ३ कोटी ७५ लाख ३८ हजार ७४६.७०  रुपये खर्च झाला आहे . ४ कोटी ८१ लाख ९९ हजार ८२१ .४९ रुपयांचा वाढवा मिळाला आहे .
लासलगाव येथून  पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार, आसाम, मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू याराज्यांसह ७६ देशांमध्ये निर्यादार व्यापा-यांकडून कांदा निर्यात केला जातो . कांद्याच्या भाववाढीत देशात मागणी वाध्ल्यासह अफगाणिस्तान, इजिप्त, अरब रिपब्लिक, व्हियेतनाम सोशल रिपब्लिक, बांगलादेश, चीन, इराण, पाकिस्तान व थायलंड येथून कांदा आयात केला जातो .
बाजार समितीच्या माध्यमातून  ग्रामीण गोदाम,शेतमाला तारण कर्ज,कांदा चाळ अनुदान, क्रेटस अनुदान,रासायनिक खत विक्री,शेतकरी भिजण व विश्राम गृह ,टिकर बोर्ड ,शेतमाल वजनमापात बंद ,सेवक व माथाडी कामगारांना ड्रेस कोड,लासलगाव येथे द्राक्षे लिलावास सुरुवात व शनिवारी कांदा लिलाव ,निफाड येथे हवामान केंद्र सुरु, बाजार आवारांमध्ये CCTV कॉमेरे ,लासलगाव व निफाड येथे वाॅटर फिल्टर प्लँट ,कार्यक्षेत्रात जलयुक्त शिवार अभियान राबविले,पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व धार्मिक स्थळांना सिमेंट बाके वाटप यासह अनेक योजना राबविल्या .
जिल्ह्य़ात नियमनम मुक्ती मुळे  लिलाव बंद होऊ नये याकरीता जिल्हा स्तरीय बैठक घेतली तसेच मुंबई येथे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच कांदा अनुदान देण्यात यावे याकरीता लासलगाव बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी करून पाठपुरावा केला असल्याचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले .

याप्रसंगी वाहेगाव सरपंच निवृत्ती शिंदे यांनी बाजार भाव चांगले राहणे आवश्यक असुन बाजारभाव वाढण्यास संचालकांनी प्रयत्न करावे अशी सुचना केली.किशोर मवाळ यांनी विंचूर उपबाजार आवारावरील सुविधा वाढविण्यात याव्यात अशी मागणी केली.गुणवंत होळकर यांनी लासलगाव येथील स्वच्छता व पाणीपुरवठा ताण कमी करण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे वतीने दरवर्षी निधीतून रक्कमेतुन तरतूद करावी अशी मागणी केली.मंगेश गवळी यांनी जलसंधारण कामे केल्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले.भाऊसाहेब गांगुर्डे यांनी माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी केली. नितिन जैन यांनी आडत व खरेदीदार यांना एकच नावाने अनुज्ञप्ती  देण्यात यावी व  कांदा भाववाढीसाठी प्रक्रीया  उद्योग सुरू करावे अशी मागणी केली. प्रमोद पवार यांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असता पाणी टाकी दिल्या बद्दल व जलसंधारण कामे केल्याबद्दल धन्यवाद दिले .
याप्रसंगी शिवनाथ जाधव ,सचिन होळकर ,संतोष ब्रम्हेचा .संतोष राजोळे , विशाल पालवे , राजेंद्र चाफेकर ,उन्मेष डुंबरे यांच्या सह कार्यक्षेत्रातील सरपंच सेवा संस्थेचे प्रतिनिधी व सुदीन टर्ले ,नरेंद्र वाढवणे , प्रकाश कुमावत , सुशील वाढवणे , सुनील डचके , सुरेश विखे ,डी.पी होळकर ,अशोक गायकवाड यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.