छत्तीसगड : माओवाद्यांच्या हल्ल्यात नाशिकचे नितीन भालेराव हुतात्मा

रायपूर दि. २९ : चार दिवसांपूर्वी माओवाद्यांनी गाड्या अडवून भारत बंदला पाठिंबा दिल्यानंतर आता माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात सीआरपीएफच्या तुकडीवर माओवाद्यांनी यावेळी माओवाद्यांनी तिथे IED ब्लास्ट घडवून आणला. या हल्ल्यात नाशिक शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेले सहाय्यक कमांडेट नितीन भालेराव   हुतात्मा झाले आहेत. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून दोघा अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. Nashik Jawan commandant Nitin Bhalerao Martyr chhatrisgad Maoists Raipur

2010 सालापासून सीआरपीएफच्या कोब्रा बटालीयन 206 चे अधिकारी असलेले नितीन भालेराव हे जवानांसोबत अभियानावरुन परतत असतानाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. राञी हॅलीकॅप्टरने उपचारासाठी रायपुरला हलवले त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जवळपास 10 जवान जखमी झाले आहेत.

सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसर हा माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार कोबरा बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते. रात्री परत येत असताना साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅपच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या अॅम्बुशमध्ये जवान फसले आणि तेथेच हा हल्ला करण्यात आला.

आठ गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रायपूर इथल्या रुग्णालयात रात्री उशिरा हेलिकॉप्टरच्या मदतीनं दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

संघर्ष सुरू

पीपल पीपल्स गुरील्ला आर्मी दोन डिसेंबरपासुन सुरु होण्याच्या पार्श्वभुमीवर माओवाद्यानी हा हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली भामरागड तालुक्यात 26 नोव्हेंबरला माओवाद्यांनी लाहेरी-भामरागड मार्ग बंद पाडून माओवाद्यांनी एसटी बस अडवली होती. या मार्गावर झाडे तोडून पीपल्स गुरील्ला आर्मी सप्ताह साजरा करण्याचे बॅनर्स माओवाद्यांनी लावले होते. आलापल्लीहून लाहेरीकडे जाणारी बस रात्री उशिरा माओवाद्यांनी हिंदेवादा जवळ अडवली होती.

अंत्यविधी सरकारी इतमामात होणार

दरम्यान, हुतात्मा नितीन भालेराव यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव रायपूर येथून विमानाने मुंबईमार्गे नाशिक येथे आणले जाईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Nashik Jawan commandant Nitin Bhalerao Martyr chhatrisgad Maoists Raipur

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.