थकीत कृषिपंप वीजबिलात होणार मोठी कपात, मंत्रिमंडळात होणार निर्णय – गिरीश महाजन

नाशिक सह राज्यातील शेतकरी वर्गाला अजून के चांगली बातमी आहे. यामध्ये ज्या शेतकरी कृषीपंप ग्राहकांकडे बिलाची रक्कम थकली आहे. मात्र त्यांना व्याजापोटी ती भरता येत नाही त्यांना आता सरकार सवलत लागू करणार आह. यामध्ये वीज बिलावरील दंडाची रक्कम माफ करून व्याजाच्या रकमेत कपात केली जाणार आहे. यामध्ये मुळ बिलाच्या 20 टक्के रक्कम भरून वीज कनेक्शन सुरू ठेवले जाणार आहे. हा उद्या (31) होणार्‍या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयाला मंजूरी देण्यात येणार आहे असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महिती  दिली आहे .

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकर्‍यांनी भारनियमन तसेच कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या विषयावर जनता दरबारात मोठ्या प्रमाणत  तक्रारी दाखल केल्या होत्या केल्या. एकच विषय पाहता सर्व तक्रारी पालकमंत यांनी निकाली काढल्या आणि वीज बिल सवलत मिळणार आहे हे सांगितले आहे.

आपले प्रश्न मांडत असताना शेतकरी

यामध्ये उपलब्ध आकडेवारीनूसार जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 5 हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास 1 हजार 183 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर परिमंडळात नगर जिल्हा सुद्धा येतो येथे दोन जिल्ह्यात एकूण 6 लाख 62 हजार कृषिपंप वीजजोडण्या अवघे 3 हजार ग्राहक वगळता उर्वरित 6 लाख 59 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 3 हजार 469 कोटी रुपयांचे वीजबिल थकिले आहे.

जनता दरबारात उपस्थित लोक प्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग .

त्यामुळे आर्थिक फटका बसेल्या महामंडळाने अनेक जोडण्या या तोडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे आज संतप्त शेतकरी वर्ग आपल्या तक्रारी केलय होत्या. यावर पालकमंत्र्यानी दिलासा दिला आहे.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.