जम्मू काश्मिरात हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिककर पायलट निनाद मांडवगणे हुतात्मा

नाशिक : भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट असलेले नाशिककर निनाद मांडवगणे यांचा आज (दि. 27) हेलीकाॅप्टर अपघात दुर्घटनेत हुतात्मा झाले आहेत. जम्मू काश्मीर मधील बडगाम क्षेत्रात तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले.

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास MI 17 V5 या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण प्रवास करीत होते. याच विमानाचे सारथ्य निनाद हे करीत होते. मात्र, सकाळी १० वाजून १० मिनिटांनी हे हेलिकॉप्टर बडगाम जवळ कोसळले. या अपघातात निनाद तसेच अन्य तीन अधिकारी व एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी निनाद यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे दिली आहे. निनाद यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने शुक्रवारी (१ मार्च) नाशिकमध्ये आणले जाईल अशी शक्यता आहे.

Nashik IAF squadron leader Martyred Jammu Kashmir

 

स्क्वाड्रन लीडर पदावर कार्यरत असलेले निनाद अनिल मांडवगणे (वय : 33) या दुर्घटनेत देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन वर्षाची कन्या, वडील, आई, धाकटा बंधू असा परिवार आहे.

आपला पुत्र भारत मातेसाठी गमावला अशी भावना निनाद यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

नाशिककर निनाद यांची औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) अकरावी, बारावी पूर्ण केल्यानंतर 26व्या तुकडीतून पुणे येथे एनडीएत झाली. त्यांनी बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून निनाद यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये झाली होती. हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 24 डिसेंबर, 2009 रोजी भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले होते. 24 डिसेंबर 2015 मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली होती. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा केल्यानंतर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक झाली होती.

ते नाशिकच्या भोसलाच्या सैनिकी स्कुलचे विद्यार्थी होते. तर डिजीपी नगर येथे त्यांचा परिवार आहे.

पुलवामा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानमधील जैशे महम्मदची ठाणी उध्वस्त केली आहेत. त्यांनतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यात दोनही देशांचे एक एक विमान गमावले आहे. भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना सुखरूप परत आणण्याची मागणी होत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.