मतदान करा हॉटेल बिलावर & चित्रपट तिकिटावर सवलत मिळवा

मतदान करा व हॉटेलच्या अन्नपदार्थाच्या बिलावर सवलत मिळवा.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निडणूकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या अवाहनास प्रतिसाद देत हॉटेल मालक चालक असोशिएशन चे सेक्रेटरी श्रीधर शेट्टी यांनी नाशिक मधील हॉटेल मालक चालक असोशिएशन मध्ये नोंदणी असलेल्या सभासद असलेल्या हॉटेलामार्फत अन्नपदार्थाच्या एकुण बीलावर दिनांक 21/02/2017 रोजी मतदान करुन आलेल्या नागरिकांना 10 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे.
नाशिक महानगपालिकेच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मतदानाच्या दिवशी जे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावुन हॉटेल मध्ये येणार आहेत त्यांना त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला म्हणून हॉटेल मधील अन्नपदार्थाच्या बीलावर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याकरीता नागरिकांनी मतदान केलेबाबतची बोटावरील न पुसण्या-या शाईची खुण दाखवावी लागणार आहे.
मतदान करा व तिकिटात सवलत मिळवा
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या अवाहनास प्रतिसाद देत सिनेमागृह मालक श्री.विनय चुंबळे यांनी दामोधर व विजयानंद या सिनेमागृहात दिनांक 21/02/2017 रोजी जे नागरिक मतदान करुन चित्रपट पाहण्यास येणार आहेत. त्यांना सिनेमागृहा मार्फत 20 टक्के सवलत देण्याची तयारी दर्शीविली आहे,या अंतर्गत दामोधर/विजयानंद या सिनेमागृहात मतदानाच्या दिवशी जे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावुन सिनेमा पाहण्यास येणार आहेत त्यांना सदर सिनेमागृहामार्फत   त्यादिवशीच्या चारही  शो करीता 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याकरीता नागरिकांनी मतदान केलेबाबतची बोटावरील शाईचे मार्क दाखवावे लागणार आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.