सिडको : मद्यधुंद घंटागाडी चालकाची मुलास मारहाण आणि शिवीगाळ

नवीन नाशिक : सिडको परिसरात दत्त चौकात प्रभाग २९ मधील घंटागाडी चालकाने लहान मुलास घंटागाडीचे नेहमीचे गाणे चालू करण्यास सांगितल्याचा राग येऊन मारहाण केल्याचा घटना रविवारी ( दि. 11) सकाळी घडली. त्याने मुलास शिवीगाळ सुद्धा केला आहे. यक चालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nashik Ghantagadi drunkard driver beats abuse child NMC CIDCO area

 

अविनाश पाटील असे नाव असलेल्या लहान मुलाला घंटागाडी चालकाने मारहाण केल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गाणे चालू करा सांगितल्यानंतर मुलास मारहाण करताना मुलाच्या आईने पाहिले आणि मुलास सोडवले.

आईने हटकले तरीदेखील चालक त्या लहान मुलास शिवीगाळ करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली आणि मद्यधुंद चालकास तेथून हकलवले. Nashik Ghantagadi drunkard driver beats abuse child NMC CIDCO area

याप्रकरणात परिसरातील महिला आणि नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे यांना माहुती दिली असता स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब खैरनार व घंटागाडी सुपरवायझर घटनास्थळी हजार होत चालक कापसेला हाकलून देत गाडी कचरा डेपो येथे जमा केली.

दरम्यान, या चालकाने या आधीही दोन वेळा अशी वर्तणूक केली असूनही त्यावर काहीही कारवाई झाझालं नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. नगरसेविका राणे यांनीही दार महिन्याला सुपरवायझर बदलण्यात येतो त्यामुळे घंटागाडी चालक आणि कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण येत नसल्याचे असे सांगितले.

Nashik Ghantagadi drunkard driver beats abuse child NMC CIDCO area
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.