गडकिल्ले भाडे तत्वावर विकासकांना देण्याच्या निर्णय रद्द करा – मावळा युवा महासंघ

राज्य शासनाने  घेतलेल्या गडकिल्ले भाडे तत्वावर विकासकांना देण्याच्या निर्णय रद्द करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांना मावळा युवा महासंघ तर्फे निवेदन देण्यात आले आहे. नुकत्याच राज्य शासनाने गड किल्ले संधर्भात निर्णय घेतला की महाराष्ट्रातील काही गड किल्ले भाडे तत्वावर विकासकांना देवून तेथे हेरिटेज निर्माण करून तेथे काही कार्यक्रम करता येतील परंतु हा निर्णय समस्त शिवप्रेमींनी मान्य नसून महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांना इतिहास आहे. 

या निर्णयामुळे हा इतिहास नष्ट होवू शकतो व भविष्यात या गड किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होवू शकते म्हणून शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि सर्व गड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा मावळा युवा महासंघाकडून संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन उपचिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 

यावेळी मावळा युवा महासंघाचे उपाध्यक्ष गोपाल मेमाणे, प्रदेशाध्यक्ष शाम जाधव,महिला जिल्हाध्यक्षा सविता ताई जगताप , नाशिक शहर अध्यक्ष संदीप पळसकर,नाशिक रोड विभाग प्रमुखअमोल जाधव, विल्होलि प्रमुख सागर थोरात, नवीन नाशिक प्रमुख पंकज हिरे,आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

“गड किल्ले असे विकासकांना देणे चुकीचे आहे. राज्य सरकारने सरकारचा निधी योग्य प्रकारे उपयोगात आणला तर नक्कीच गड किल्ले उत्तम होऊ शकतात. यामुळे पयर्टन सुद्धा वाढेल, मात्र भाडे तत्वावर देऊन येथे खासगी कार्यक्रम आणि हॉटेल निर्माण करणे चुकीचे आहे. आमचा या गोष्टीला विरोध आहे.”  – संदीप पळसकर , नाशिक शहर अध्यक्ष मावळा युवा महासंघ 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.