स्वाईन फ्लु चार वर्षीय मुलीवर यशस्वी उपचार डॉ. पवार वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात मिळाले जीवदान

नाशिक : स्वाईन फ्लु आजाराने गंभीर स्थितीत दाखल झालेल्या साडे चार वर्षीय मुलीला जीवदान देण्यात मविप्रच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. श्रेया पुन्हा खेळू बागडू लागल्याने तीच्या नातेवाईकांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाचा सत्कार करीत उपचार पध्दती व डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी टिमचे कौतुक केले. सध्या नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाईन फ्लू ने थैमान घातले आहे, त्यामुळे तिला योग्य उपचार मिळाल्याने हा कौतुकाचा विषय झाला आहे.

येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील  श्रेया बापुसाहेब क्षीरसागर ही मुलगी आजारी असल्याने तीला तीच्या नातेवाईकांनी प्राथमिक टप्प्यात येवला येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तीची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तीला नाशिकमधील खासगी रुग्णालयात  दाखल केले दिड दिवस उपचार घेतले परंतु   अधिक स्थिती गंभीर झाली. व संबंधित रुग्णालयाने रुग्ण घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

येवला व नाशिक येथे ७०  हजारांवर उपचाराचा खर्च झाला. क्षीरसागर कुटुबिय मानसिक व आथिॅकदृष्टया पुरते खेचुन गेले.श्रेया वर आता उपचार कुठे करायचेहा प्रश्न समोर आला असतांना शेवटचा प्रयत्न म्हणुन आडगाव येथील डाॅ वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात दाखल करू ,असे ठरले व श्रेयाला मविप्र रुग्णालयात गंभीर स्थितीत आणले.

मविप्र रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या डॉक्टर श्रेयावर तत्काळ उपचार सुरू केले. आथिॅक परिस्थिती पाहुन श्रेयाला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतुन 11 ऑक्टोबरला दाखल केले. 25 ऑक्टोबर पयॅत श्रेया व्हेंटीलेटरवर होती.  याकाळात   मविप्र रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या डॉक्टर व त्यांच्या टिमने  अहोरात्र  अथक प्रयत्न  केले आहेत.

श्रेयाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला तीची प्रकृती सुधारली.  श्रेयाला  जीवदान दिल्याने श्रेयाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या  अधिष्ठाता  मृणाल पाटील,शिक्षणाधिकारी डॉ.आर.डी. दरेकरवैद्यकिय अधिक्षक डॉ.अजित पाटील , डॉ.संजिता चढ्ढा  परिचारिका   यांच्या टिमने श्रेयावर  दिवस राञ  उपचार केल्याने श्रेयाच्या  प्रकृतीत सुधारणा झाली. श्रेया पुन्हा खेळु बागडु लागल्याने श्रेयाची आई प्रतिभामामा नारायण सोनवणेआजोबा पुंडलिक क्षिरसागर,  गोरक्ष गायकवाड यांना अश्रृ अनावर झाले. मविप्र रुग्णालयाने माझ्या मुलीला जीवदान दिले. त्यांच्या उपचारांमुळे माझी श्रेया खेळु लागली,अशी प्रतिक्रिया तीच्या आईने आनंदअश्रृ ढाळत व्यक्त केली.  मविप्र च्या सरचिटणीस निलीमाताई पवार सर्व पदाधिकारी व संचालक यांनी मविप्र रुग्णालयाच्या या रुग्णसेवेचे कौतुक केले आहे.

मविप्र रुग्णालयाने माझ्या मुलीला जीवदान दिले . डाॅक्टरांनी अथक प्रयत्न करीत  त्यांच्या उपचारांमुळे माझी श्रेया खेळु लागली ,

  –  श्रेयाची आई – प्रतिभा क्षिरसागर

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.