येत्या मंगळवारी नाशिक जिल्हा सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

नाशिक : नववर्षात दि.11 ते 13 जानेवारी दरम्यान गोंदिया येथे होणाऱ्या राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा संघ निवड करण्यासाठी नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने येत्या मंगळवारी (दि.25 डिसेंबर) सकाळी 7 वाजता त्रंबक विद्या मंदिर येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. nashik district cycling team selection december 2018 sports

अशा विविध पाच वयोगटात होणार ही निवड चाचणी

वयोगट

1) 14 वर्षाखालील मुले/मुली (जन्मवर्ष 2004, 2005, 2006),

2) 16 वर्षाखालील मुले/मुली जन्मवर्ष (2002, 2003),

3) 18 वर्षाखालील मुले/मुली जन्मवर्ष (2000, 2001),

4) 23 वर्षाखालील मुले/मुली जन्मवर्ष (1995 ते 2001),

5) पुरुष व महिला गट जन्मवर्ष (1982 ते 1999) यानुसार जिल्हा संघ निवड होणार आहे. nashik district cycling team selection december 2018 sports

वरिष्ठ गटासाठीच्या स्पर्धा पूर्णपणे भारतीय बनावटीच्या विना गियर सायकल वर होणार असून या गटात 19 ते 35 वर्षाच्या कोणत्याही स्पर्धकांना भाग घेता येणार आहे. इतर कोणत्याही गटासाठी सायकल कशी असावी याचे बंधन नाही.

ही स्पर्धा नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात येणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संघटनेच्या पदाधिकारी व संघटकांकडून करण्यात आले आहे. नाव नोंदणी करिता योगेश झुंबर टिळे, मोबा. 9011470409 यांचेशी संपर्क करावा.

nashik district cycling team selection december 2018 sports
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.