नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे क्रीडाक्षेत्रातील कर्मयोगींचा सन्मान

 नाशिक ( प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर श्री.प्रवीण ठिपसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने नाशिक जिल्ह्यातून क्रीडाक्षेत्रातील कर्मयोगीचा सन्मान करण्यात आला. विविध क्रीडाक्षेत्रातील अनेक नावाजलेल्या प्रशिक्षक व आयोजकांचा सत्कार घडवून आणला. Nashik District Chess Association honored Sports enthusiasts Pravin Thipse

अतिशय तळमळीने, संपूर्ण आयुष्य क्रीडा क्षेत्राला वेचणाऱ्या दिगग्जांच्या संन्मान सोहळ्याला नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रवींद्रजी नाईक, पद्मश्री भाग्यश्री ठिपसे, अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन्मानार्थीं मध्ये नेमबाजीच्या अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे, खो-खोचे मंदार देशमुख, क्रिकेटचे मकरंद ओक, बॅडमिंटनचे मकरंद देव, जिम्नॅस्टिकचे प्रबोधन डोंगावकर व संदीप शिंदे, जलतरणचे राजेंद्र निंबाळते, मल्लखांबचे यशवंत जाधव, वेटलिफ्टिंगचे प्रवीण व्यवहारे, अॅथलेटिक्सचे राजीव जोशी आणि मूकबधिर संघटनेचे प्रकाश फडके यांचा समावेश होता.

क्रीडा क्षेत्रात प्रथमच एका संघटनेने आपल्या खेळाव्यतिरिक्त इतर खेळातील समर्पित प्रशिक्षकांच्या कार्याचा सन्मान करत परस्पर सहकार्याने खेळ संस्कृती निकोप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पहिल्या टप्प्यात निवडक खेळांसाठी सन्मान प्रदान करत दुसऱ्या टप्प्यात इतर कार्यधुरीणींचा देखील सन्मान करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. Nashik District Chess Association honored Sports enthusiasts Pravin Thipse

या बुद्धिबळ दिनानिमित्त जिल्हा संघटना ५० खेळाडूंना दत्तक घेत असून शाळाशाळांतून गुणवत्तापूर्ण खेळाडूंना निवडत त्यांना वर्षभर मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध शाळांना तसेच क्रीडा शिक्षकांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करत या योजनेचा शुभारंभ होत असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे यांनी केली.

खेळाडूंच्या हितासाठी झगडणाऱ्या या संघटनेच्या दूरदर्शी कार्यक्रमास दाद देत शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य या कार्यास भविष्यात असेल असे मत या मंगल प्रसंगी क्रीडा अधिकारी रवींद्र नाईकांनी व्यक्त केले. शारीरिक खेळांबरोबरच मानसिक व बौद्धिक क्षमतेचा विकासासाठी नियमित व्यायामावर भर देत खेळाडूंनी आयुष्यात समतोल साधला पाहिजे असे मत प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी ठिपसे दांपत्याने पालकांशी मोकळा संवाद साधत बुद्धिबळातील विविध अडचणींना कसे सोडवता येऊ शकते व बुद्धिबळाच्या डावपेचांचा अभ्यास कसा करता येईल याचे मार्गदर्शन केले. Nashik District Chess Association honored Sports enthusiasts Pravin Thipse

अथर्व मंगल कार्यालयात क्रीडाप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने पालक, खेळाडु व क्रीडा पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भूषण ठाकूर, सचिन निरंतर, मंगेश गंभीरे, डॉ. सचिन व्यवहारे, विनायक वाडीले, भूषण पवार, निवेदिका सुनेत्रा मांडगावणे आदींनी परिश्रम केले.

Nashik District Chess Association honored Sports enthusiasts Pravin Thipse
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.