राज्यस्तरीय ज्युनिअर खुल्या बॅडमिंटन स्पर्धा नाशिकच्या वैदेही, अजिंक्यला विजेतेपद,

राज्यस्तरीय ज्युनिअर खुल्या बॅडमिंटन स्पर्धा; नाशिकच्या वैदेही, अजिंक्यला विजेतेपद, नागपूरच्या रितिकाला तिहेरी मुकुट

नाशिक : नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या वैदेही चौधरीने १९ वर्षाखालील गटात पुण्याच्या पूर्वा बर्वे हिला नमवत विजेतेपद पटकावले. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यांच्यावेळी नाशिकचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू उदय पवार तसेच नाशिकची माजी राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा गद्रे उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. Nashik District Badminton Association State Open Vaidehi ajinkya Patharkar

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात नागपूरच्या रितिका ठाकर हिने वर्चस्व राखत मुलींच्या एकेरी व दुहेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. एकेरीत शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात पुण्याच्या पूर्वा बर्वेला २१-१३, २१-१९ असे पराभूत केले. पहिल्या सेट मध्ये रीतीकाने चांगला खेळ करत वर्चस्व ठेवले. दुसऱ्या सेट मध्ये पूर्वाने चांगला संघर्ष केला. परंतु रीतीकाने आपला खेळ उंचावत विजेते पदाला गवसणी घातली. तर दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीने आर्या शेट्टी आणि जान्हवी जगताप या जोडीचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात एकेरीत ठाण्याच्या अमन संजय याने मुंबईच्या अक्षण शेट्टी याचे आव्हान २१-१८, २१-११ असे परतवून लावत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर दुहेरीत नाशिकच्या अजिंक्य पाथरकर आणि मुंबईच्या अक्षण शेट्टी या जोडीला विजेतेपदाची चव चाखावयास मिळाली. या जोडीने नागपूरच्या गौरव मिथे आणि रोहन गर्बानी या जोडीचा २१-१९, १५-२१, २१-१४ असा पराभव केला. तिसर्या सेटमध्ये मिथे-गर्बानी जोडीकडे ११-५ अशी आघाडी असूनही अजिंक्य-अक्षण जोडीने विजयश्री खेचून आणली.

मुलींच्या १९ वर्षाखालील गटात दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीने नाशिकच्या अदिती कुटे आणि विशाखा पवार या जोडीवर २१-१२, २१-१७ अशी मात करत विजय मिळवला. तर मुलांच्या दुहेरीत अनिरुद्ध मयेकर आणि कारण जाधव जा जोडीने पुण्याच्या देवाशिष नावडीकर आणि हर्ष जगधने या जोडीचा २०-२२, २१-१५, २१-१३ असा फडशा पडला. पहिल्या एत्मध्ये केलेली दमदार सुरुवात नंतर टिकवून न वेता आल्याने नावडीकर-जगधने या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

१७ वर्षाखालील मुलांच्या एकेरीत धमाकेदार विजय मिळवणाऱ्या अमन संजय याला १९ वर्षाखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्याच्या सुरुवातीलाच गंभीर दुखापत झाल्याने पुण्याच्या आर्य भिवपत्कीला विजयी घोषित करण्यात आले. सामना सोडला तेव्हा अमनकडे ३-० अशी आघाडी होती. Nashik District Badminton Association State Open Vaidehi ajinkya Patharkar

दरम्यान, पारितोषिक वितरण करताना उदय पवार यांनी सांगितले कि, या खेळाडूंचा खेळ बघताना विशेष आनंद होत असून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आता उभ्या राहिल्या असून त्यातूनच असे खेळाडू घडत आहेत. या वर्षी पुढील काही महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. सांघिक स्पर्धेत विजय मिळवलेल्या नागपूरच्या संघेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. खेळामुळे आत्मविश्वास, चांगले आरोग्य मिळते त्यामुळे आपण खेळाची सेवा केली पाहिजे असेही उदय पवार बोलले. त्याचप्रमाणे प्रज्ञा गद्रे हिने खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले कि, बॅडमिंटनमधील करिअर हे कमी कालावधीचे असल्यामुळे खेळाडूंनी १५ ते २० याच वयात जास्त कष्ट घेण्याकडे लक्ष द्यावे.

 

RSM_1460

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RSM_1554

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.