नाशिक : नटनाद ढोल-ताशा पथक एक तास 201 ध्वज नाचवून नोंदविणार जागतिक विश्वविक्रम

नाशिक : एकाच वेळी ढोलच्या तालींवर आपल्या हिदू संस्कृतीचा मान असलेल्या २०१ ध्वजानां १ तास सतत नाचवून बाप्पांना २०१ ध्वजांचा महानैवद्य देऊन नटनाद ढोल-ताशातर्फे पथक विश्वविक्रम करण्याचा दावा करणार असून जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (GENIUS BOOK OF WORLD RECORD) आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (WONDER BOOK OF RECORD) मध्ये याची नोंद केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. गणेशोत्सव २०१८ मध्ये नटनाद ढोल ताशा पथक व मा.श्री.समाधान दादा जाधव यांचे नवीन आडगाव नाका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१६) सायंकाळी ०७.०० वाजता नवीन आडगाव नाका, नाशिक येथे हा प्रयत्न केला जाणार आहे. Nashik Dhol Pathak Natnaad report world record 16sept 201 dhwaj

 

Nashik Dhol Pathak Natnaad report world record 16sept 201 dhwaj

नाशिक मध्ये सार्वजनिक उत्सवात वादन करणारे नटनाद नावाचे ढोल पथक आहे. दिंडोरी रोड येथे गेल्या दोन वर्षांपासून या पथकाद्वारे सतत ढोलचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या पथकात सुमारे २०० वादक आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील म्हणजे महसूल उपआयुक्त, वकील, शिक्षक, व्यापारी व शाळा कॉलेजमधील विद्यार्थी यांचा अंतर्भाव आहे. Nashik Dhol Pathak Natnaad report world record 16sept 201 dhwaj

हा उपक्रम नाशिकसाठी महत्वाचा असणार आहे. त्यासाठी आपल्या नाशिकच्या ढोल पथकाची एका नाविन्य असलेल्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासोबतच सर्व ढोल वादक, ध्वज-धारक यांचा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन नवीन आडगाव नाका मित्र मंडळाचे समाधान दादा जाधव व नटनाद ढोल ताशा पथकाचे संचालक कुणाल अहिरे, विक्रांत सोनावणे तसेच सर्व वादक यांनी केले आहे.

Nashik Dhol Pathak Natnaad report world record 16sept 201 dhwaj
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.