नाशिक होणार डिफेन्स इनोव्हेशन हब; डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

१५ जून रोजी संरक्षण चर्चासत्र, सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी करणार मार्गदर्शन

नाशिक : लष्करी विमान निर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटीक्स असल्याने नाशिकला महत्व आहे, आता याच बरोबर संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळात रहावी याकरीता केंद्र सरकार ‘डिफेन्स इनोव्हेशन हब‘ ची नाशिकमध्ये निर्मिती करणार आहे. Nashik defence innovation hub dr subhash bhamre

त्यामुळे मोठा रोजगार निर्मित होईल सोबत लघु उद्योगाला फायदा होणार आहे अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.

याच विषयानुरूप सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्‍चरर्सभारतीय संरक्षण मंत्रालय आणि सी. आय. आय. यांच्या विद्यमाने डिफेन्स हबची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल शुक्रवारी (दि. 15) विद्यमाने दिवसभर हॉटेल एमरॉल्ड पार्कमध्ये संरक्षण व संरक्षण हवाई उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी संधी याविषयावर चर्चासत्र होत आहे. Nashik defence innovation hub dr subhash bhamre

या माध्यमातून उद्योजकांना संरक्षण क्षेत्राशी निगडीत विविध उत्पादने व त्यांच्या गुवत्तेविषयी मार्गदशर्न केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. भामरे यांनी दिली आहे.

देशात या आगोदर कोईमतूर या ठिकाणी डिफेन्स इनोव्हेशन हबची सुरुवात झाली आहे. त्यानंतर नाशिकमध्येही संरक्षण क्षेत्राशी निगडीत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी डिफेंस इनोव्हेशन हब विकसित कऱण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने  देशा अंतर्गत आपणच स्वतः  संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला पूरक ठरेलअसे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधी या विषयावर नाशिकमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात केले आहे. Nashik defence innovation hub dr subhash bhamre

खासगी संस्थांनी संरक्षण भांडारविषयक तयार केलेल्या साहित्याची गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सीज (आऊट सोर्सिंग ऑफ क्वॉलिटी ऍश्‍युरन्स फंक्‍शन फॉर डिफेन्स स्टोअर्स मॅन्युफॅक्‍चरड बाय प्रायव्हेट इंडस्ट्रीज टू थर्ड पार्टी इन्स्पेक्‍शन एजन्सीज) आणि व्यापार प्राप्ती योग्य सूट प्रणाली (ट्रेड रिसिव्हेएबल्स डिस्कॉन्टिंग सिस्टीम) चर्चासत्राच्या निमित्ताने शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. भामरे यांनी दिली आहे.

नगरलाही संधी

मुंबई, नाशिक व पुण्याजवळ असल्याने अहमदनगर जिल्ह्यातही अधिक प्रमाणत सुक्ष्मलघु व मध्यम उद्योग आहेत. हे सर्व मोठ्या उद्योगांवर अवलंबून आहेत.येथे वस्तू, साहित्य निर्मिती करून हे  पुणे , मुंबईसारख्या औद्योगिक क्षेत्रासाठी मुख्य पुरवठादार होऊ शकणार आहेत. सोबतच आपल्या देशातील सैन्याचे शस्त्रास्त्र, युद्धसामग्री उत्पादन स्वदेशी करण्यासाठी हे चर्चासत्र उपयोगी ठरणार आहे असे डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले आहे. Nashik defence innovation hub dr subhash bhamre

या महत्वपूर्ण चर्चासत्रात अॉर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी)संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठान (डीआरडीओ)डायरेक्टर जनरल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स (डीजीक्युए) डायरेक्टर जनरल एअर क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स (डीजीएक्यूए)एचएएलजीएसएल सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसह खासही उद्योगांचे प्रतिनिधीही या चर्चासत्रात सहभागी होत आहेत. तर नाशिकच्या सर्व स्थानिक इंडस्ट्रिज , लघुउद्योग सबंधित आदी संघटनांही आपला सहभाग नोंदवणार आहेत.

चर्चासत्रात कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय)चे पश्चिम विभाग अध्यक्ष पिरुझ खामबत्ता , सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅ क्चरर्सचे महासंचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रता साहाभारतीय हवाई दलाचे एअरमार्शल एस.बी. देवभारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबूकिर्लोस्कर पंपचे प्रकल्प प्रमुख सुनील बापटआर्टिलरी स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारियानौदलाचे रिअर ऍडमिरल संजय वस्त्यायनहवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल बी. आर. कृष्णाकिर्लोस्कर न्युमॅटीक कंपनीचे अध्यक्ष राहूल किर्लोस्करएच. ए. एल. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंगमहिंद्रा समूहाचे अध्यक्ष एस. पी. शुक्‍लालष्कराचे मेजर जनरल शंतनू दयाळ,नौदलाचे रिअर ऍडमिरल राजाराम स्वामीनाथन्‌हवाई दलाचे अतिविशिष्ट सेवापदक विजेते बी. के. सूदराज्याच्या लघु व मध्यम उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळेजलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन मार्गदर्शन करतील.

Nashik defence innovation hub dr subhash bhamre
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.