नाशिक सायकलीस्ट्स मोडणार बांगलादेशचा गिनीज रेकॉर्ड

​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनचा निर्धार, लाँगेस्ट सिंगल लाईन ऑफ बायसीकल्स (मुविंग)

नाशिक : ​​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन नाशिक शहरात सायकलिंगचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नाशिकला सायकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करताना ​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन ‘लाँगेस्ट सिंगल लाईन ऑफ बायसीकल्स (मुविंग)’ या प्रकारचा बांगलादेशात करण्यात आलेला विक्रम मोडीत काढून जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन करणार आहे. या अनोख्या उपक्रमात २००० पेक्षा जास्त सायकलीस्टला सहभागी करून घेण्यात येणार असून ४ फेब्रुवारी रोजी याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. ४) झालेल्या पत्रकार परिषदेत ​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी याबाबत घोषणा केली.

nashik cyclists guinness book of world record of longest single line of bicycles moving press conference

​गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठीच्या उपक्रमासाठी नोंदणी पूर्ण झाली असून सर्वप्रकारच्या परवानग्या मिळविण्याचे काम सुरु आहे. उपक्रमाची संपूर्ण तयारीची सुरुवात ​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनकडून सुरु करण्यात आली आहे. यात नाशिकमधील शाळा व महाविद्यालयांना सहभागी करवून घेण्यात येणार असून काही शाळांच्या प्रशासनांनी सहभागी होण्याची इच्छा दाखवली आहे. अजून इच्छुक शाळा महाविद्यालयांनी संपर्क करण्याचे आवाहन नाशिक सायकलीस्टतर्फे करण्यात आले आहे. मनपाच्या शाळांतील तसेच नाशिकमधील आदिवासी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टीशर्ट व तात्पुरत्या वापरासाठी हेल्मेट देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमात २००० सायकलीस्ट एका रांगेत एकमेकांमध्ये एक मीटरचे अंतर सोडून १० किलोमीटर पर्यंत सायकल चालवणार आहेत.

सामाजिक संस्था म्हणून नाशिकमध्ये सायकल चळवळ चालवणाऱ्या नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात या उपक्रमात सहभागी होणार असून देश निरोगी व्हावा, स्थानिकांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहित करून परिसरातील प्रदूषण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात अनेक विद्यार्थी, विविध पदांवर काम करणारे सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, अभियंते, उद्योजक, वकील यांचा समावेश असणार आहे.

नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंगजी यांनी सायकलिंग चळवळ मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली असून ही चळवळ अजून पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एनसीएफचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी यावेळी सांगितले. सायकलिंगचा प्रचार होईल असे विविध प्रकारचे अनेक नवे उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.

यात १४ नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय बाल दिवस निमित्ताने चिल्ड्रन राईड, सायकलवरून पत्र तसेच महत्वाचे कागदपत्रे पोच करणाऱ्या पोस्टमन काकांसाठीची पोस्टमन राईड, दिवाळी मिलन अंतर्गत नाशिक सायकलीस्ट शहरात सायकलवर फिरून सामन्यांकाडचा फराळ व नवे कपडे आदिवासी पाड्यांवर वाटण्याचा कार्यक्रम, दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग यांच्या वाढदिवशी (१८ जानेवारी) रक्तदान शिबीर, व्हलेटाईन डेच्या दिवशी नॅबसह डिव्हाईन राईड तसेच विविध स्तरातील जोडप्यांना प्रेम व्यक्त करण्यासाठीची टॅण्डम सायकल राईड, इंटरनॅशनल राईड, निसर्गरम्य अशा कोकणातील समुद्र किनाऱ्यावरून जाणारी कोकण कोस्टल राईड, एनआरएम या नाशिक सायकलीस्टच्या महत्वाच्या उपक्रमाची व्याप्ती वाढविणे, पंढरपूर वारीच्या धर्तीवर अष्टविनायक सायकल यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

महिला सबली कारणासाठी ​नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असून गिनीज रेकॉर्ड्समध्ये नोंद होणाऱ्या उपक्रमात ५०% पेक्षा जास्त महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वूमन्स डेच्या निमित्ताने होणाऱ्या वूमन्स राईडसह अजून एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या महिलांचा सन्मान फाउंडेशन तर्फे करण्यात येणार असून अशा महिलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अशा महिलांची माहिती असल्यास याबाबत कळवण्याचे आवाहन नाशिक सायकलीस्टतर्फे नाशिककरांना करण्यात आले आहे.

बांगलादेश मधील ढाका येथील विक्रमाची थोडक्यात माहिती

बीडीसायकल्स या सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविला होता. यात प्रत्यक्षात १२०० सायकलीस्ट सहभागी झाले होते मात्र काही सायकलीस्टला सर्व अटींची पूर्तता करणे शक्य न झाल्याने ११८६ असा आकडा नोंद करण्यात आला. ढाका शहरात पूर्वांचल महामार्गावर त्यांनी सलग २ मैल एका रांगेत विशिष्ट अंतर ठेऊन सायकल चालवली होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.