सायकलिंग : येत्या जानेवारीत ‘नाशिक पेलेटॉन’ चे आयोजन

सायकलिंगचा प्रचार करण्याच्या उद्देशाने नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनचा प्रयत्न

नाशिक : नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने ‘नाशिक पेलेटॉन २०१८’ ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा ६ व ७ जानेवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्या ६ वर्षापासून शहरात सायकलचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन प्रयत्न करत असताना २०१४ साली पहिल्यांदा पेलेटॉनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून संपूर्ण भारतातून स्पर्धक सहभागी होत असतात. यावर्षीही नोंदणी साठी ऑनलाईन सुविधांचा खुबीने वापर करून घेण्यात येणार असून स्पर्धक नाशिक सायकलिस्ट्सच्या संकेतस्थळावरही नोंदणी करू शकणार आहेत.

रस्त्यावरील सायकल स्पर्धा (OnRoad Cycling Race) हा लोकप्रिय क्रीडा प्रकार असून नाशिक पेलेटॉन ही स्पर्धा देखील हा खेळ लोकप्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. दीर्घ पल्ल्याची (१५० किमी) नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या अवघड घाटवळणांवरून नाशिक पेलेटॉनचे स्पर्धक मार्गक्रमण करतील.

nashik cyclists peloton app

 

१५० किमीची पेलेटॉन स्पर्धा १८ ते ४० वर्षातील महिला व पुरुष गट तसेच ४० वर्षावरील गटासाठी नाशिक – कसारा – घोटी – कावनई – त्र्यंबकेश्वर – नाशिक अशा मार्गावर होईल. तर ५० किमीची मिनी पेलेटॉन स्पर्धा नाशिक – त्र्यंबकेश्वर – नाशिक अशा मार्गावर होणार आहे.​

यावर्षी पेलेटॉन २०१८ मध्ये १५० किमी पेलेटॉन स्पर्धेसाठी इलाईट ग्रुप असा विशेष गट तयार करण्यात आला असून सायकलिंग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न विविध स्पर्धांत सहभाग घेतलेल्या व्यावसायिक सायकलिस्ट्ससाठी स्पर्धा संपवण्याची वेळ व इतर वेगळे नियम करून त्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांमध्येही विशेष तरतूद करण्यात आली आहे.​

तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांकरिता १५ किमीची विशेष​ पेलेटॉन​ आणि हौशी सायकलिस्ट्ससाठी (सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी) ५ किमीची ‘जॉय राईड’ देखील आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना दरवर्षीप्रमाणे मोठी बक्षिसे देण्यात येणार असून एकूण बक्षिसांची रक्कम १० लाखापर्यंत आहे. घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताबही दिला जाणार आहे.

गेल्या ६ वर्षापासून सायकलचा वापर वाढवा म्हणून नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन प्रयत्न करत आहेत. सायकलिंग विषयी माहिती व्हावी, सायकल्सचा वापर वाढवा जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सातत्याने इंडियन सायकल डे नाशिक मुंबई रॅली, पंढरपूर सायकल वारी, एनआरएम सायकलिंग, लहान मुलांसाठी दर महिन्यात एक राईड अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिक मधील चळवळ पुढे नेण्याचा नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचा प्रयत्न आहे. सायकलचा जास्तीत जास्त वापर वाढवावा, शहरे प्रदूषणमुक्त व्हावीत हा देखील या चळवळीमागील प्रमुख उद्देश आहे.

यावेळी नाशिक सायकलिस्ट्सचे सचिव नितीन भोसले, मार्गदर्शक डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, राजेंद्र वानखेडे, शैलेश राजहंस, उपाध्यक्ष योगेश शिंदे, वैभव शेटे, ​तसेच नाना फड, श्रीकांत जोशी, सोफिया कपाडिया, नीता नारंग,​ स्नेहल देव, विजय पाटील, रत्नाकर आहेर आदी उपस्थित होते.

nashik cyclists peloton 2

नाशिक पेलेटॉन – २०१८’ स्पर्धचे फॉर्म नाशिकमध्ये खालील पत्त्यांवर उपलब्ध –

१) शिवशक्ती सायकल्स, शंकराचार्य न्यास जवळ, गंगापूर रोड

​२​) लुथरा एजन्सीज, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड

​३) भांड सायकल्स, इंदिरा नगर

४) बॉडी फ्युएल अँड​ गिअर, बोधले नगर, नाशिक रोड

५) ए टू झेड सायकल्स, जीपीओ रोड, शालीमार

​६) सायकल अड्डा, नाशिक सायकलिस्ट्स कार्यालय, जीपीओ रोड, शालीमार

७) डीकॅथलॉंन, जैन मंदिरा समोर, विल्होळी

पेलेटॉन २०१८ सा​ठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (nashikcyclists.com) या संकेतस्थळावर करता येणार असून २५ नोव्हेंबर पासून सुविधा सुरु करण्यात येणार आहे. गुगल फॉर्म तसेच इमेल किंवा व्हाट्सअॅप वरून पीडीएफ अर्जाची प्रिंट काढून त्यामध्ये माहिती भरून नाशिक सायकलिस्ट्सच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २​ जानेवारी २०१८​ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठीnashikcyclists.com या संकेतस्थळाला भेट देण्याचा आवाहन करण्यात आले आहे.

अशी होईल स्पर्धा :

१५० किलोमीटर पेलेटॉन स्पर्धा : नाशिक-कसाराघोटीकावनईत्र्यंबकेश्वरनाशिक

* ​(१८ ते ४० वयोगट) पुरुष व महिला​

* (४० वर्षापुढील गट) पुरुष व महिला​

​* (इलाईट ग्रुप) पुरुष व महिला​

पन्नास किलोमीटर मिनी पेलेटॉन स्पर्धा : नाशिक – त्र्यंबक – नाशिक

* (​१८ ते ४० वयोगट)​ पुरुष ​व ​महिला

​* (​४० वर्षांपुढील वयोगट)​ पुरुष व महिला​

पंधरा किलोमीटर स्प्रिंट पेलेटॉन स्पर्धा :

* (१२ ते १४ वयोगट) मुले आणि मुली

* (१५ ते १८ वयोगट) मुले आणि मुली

जॉय राईड :

हौशी सायकलीस्ट (सर्व वयोगट)

बक्षिसांची एकूण रक्कम : १० लाख

घाटातील अंतर कमीतकमी वेळेत पार करणाऱ्या स्पर्धकाला घाटाचा राजा’ किताब

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “सायकलिंग : येत्या जानेवारीत ‘नाशिक पेलेटॉन’ चे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.