नाशिक सायकलिस्ट्सची एनआरएम सेंच्युरी राईड उत्साहात

नाशिक नांदूरमध्यमेश्वर राईडमध्ये आबालवृद्ध १३० सायकलिस्ट्सचा सहभाग

नाशिक : डिसेंबर २०१६ मध्ये ज्या राईडमधून नाशिक रँडोनर्स मायलर्स अर्थात एनआरएम या संकल्पनेचा उदय झाला ती सेंच्युरी राईड आज (दि. ३) करण्यात आली. नाशिक पासून चांदोरी मार्गे नांदूरमध्यमेश्वर – निफाड – सायखेडा ते नाशिक असे १०० किमीचे अंतर १३० सायकलिस्ट्सने पूर्ण केले.

राईडमध्ये मोठ्याप्रमाणात महिलांसह वयवर्षे १२ ते ७२ वर्षांपर्यंतच्या सायकलिस्ट्सने सहभाग घेतला. यात पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, एक्साईजचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह डॉ. राजेंद्र नेहेते, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी सहभाग नोंदवला.

यात एक्साईजचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी पत्नी सोनाली सुर्वे तसेच डॉ. मनीषा आणि नितीन रौंदळ, रवींद्र आणि साधना दुसाने अशा दांपत्यांनी सहभाग नोंदवला.

येत्या जानेवारीत ‘नाशिक पेलेटॉन’ चे आयोजन

सकाळी ६ वाजता जुना गंगापूर नाका येथील फायरफॉक्स सायकल्स येथून राईडला सुरुवात करण्यात आली. चांदोरी येथे गोदाकाठ सायकलिंग क्लबचे डॉ. आबा पाटील यांनी सायकलिस्ट्सचे स्वागत केले आणि नांदूरमध्यमेश्वर येथे सायकलिस्ट्ससाठीची व्यवस्था पाहिली.

सेंच्युरी राईड पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सायकलीस्टला सहभाग प्रमाणपत्र (पार्टीसीपेशन सर्टीफिकेट) देण्यात आले.

त्यानंतर सर्वच सायकलिस्ट्सने नांदूरमध्यमेश्वर येथील तलाव आणि पक्षी अभयारण्याला भेट दिली. परतीचा प्रवास करताना सायखेडा येथे सायखड्याचे सरपंच यांनी सायकलिस्ट्सचे स्वागत केले.

निसर्गाशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न

सेंच्युरी राईड चांदोरी, निफाड, नांदूरमध्यमेश्वर, सायखेडा, नाशिक अश्या निसर्गसंपन्न मार्गावरून करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात थंडीचा वाढलेला जोर राईड साठीचा उत्साह आणि उत्कंठा वाढवून गेल्याचे नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया म्हणाले. तर कार किंवा दुचाकीवर फिरताना आपण निसर्ग बघण्यास मुकतो. १५ किमी प्रतितास इतक्या कमी वेगाने सायकल चालवत जास्तीतजास्त निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न केले अशी प्रतिक्रिया एनआरएम प्रमुुुुख  धीरज छाजेेेड यांनी दिली आहे.

या राईडदरम्यान सायकलिस्ट्सने नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या थंडीच्या ज्वरात सायकलिंगचा पूर्ण आनंद लुटला. राईड यशस्वी होण्यासाठी एनआरएम टीमचे गणेश पाटील, विकाश जैन यांनी प्रयत्न केले.

२०१६ साली ३ डिसेंबर रोजी नाशिक सायकलिस्ट्सचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांनी जास्तीतजास्त सायकलिस्ट्सने मोठ्या राईड्स कराव्यात या उद्देशाने सेंच्युरी राईडचे आयोजन केले होते. त्याच संकल्पनेतून एनआरएम चा जन्म झाला. मागील वर्षी या राईडमध्ये ११० सायकलिस्ट्सने सहभाग नोंदवला होता.

नाशिकच्या ग्रामीण भागात सायकल वरून जाताना निसर्गाशी जवळीक साधण्याबरोबरच शहरी भागातील सोयी सुविधा नसतानाही निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे आनंदी आहेत हा संदेश पोचविण्यासाठी या सेंच्युरी राईडचे आयोजन करण्यात आले होते. याही वर्षी त्याच उद्देशाने राईडचे आयोजन करण्यात आले.

सेंच्युरी राईड बद्दल :
१०० किमीचे अंतर
१३० सायकलीस्टचा सहभाग
१५ किमी कमाल वेग

निसर्गाशी जास्तीतजास्त सानिध्य साधण्याचा प्रयत्न

नांदूरमध्यमेश्वर परिसरातील गावकऱ्यांशी संवाद, सायकलिंग विषयी जागृती

निसर्गाच्या सानिध्यामुळे गावाकडील लोक शहरी

सुविधांशिवाय आनंदी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न

जानेवारीत होणाऱ्या नाशिक पेलॉटॉन-२०१८ मध्ये सुविधा पुरविण्याविषयी रंगीत तालीम

अशाच बातम्या मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.