नाशिक सायकलिस्ट : रविवारी दिव्यांगांसाठीची ‘डिग्निटी राईड’चे आयोजन

Share this with your friends and family

 

Nashik cyclists dignity ride for disables prahar sanghatna

 

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठीची तीनचाकी सायकल रॅली येत्या रविवारी (दि २१) रोजी आयोजित करण्यात आली आहे. ‘लाईव्ह विथ डिग्निटी’ म्हणजेच ‘प्रतिष्ठेसह जागा’ असा संदेश या रॅलीत देण्यात येणार आहे.

हाताने सायकल चालवून दैनंदिन कामे करणाऱ्या या खऱ्या खुऱ्या सायकलिस्टला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या कुटुंबात सहभागी करून घेण्यात येणार आहे. हे दिव्यांग लोक कधीच सामान्य जीवन जगत नाहीत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भीती घट्ट बसलेली असते. त्यांना सहानुभूती नको, हवी असते ती प्रतिष्ठा. ती प्रतिष्ठा त्यांना मिळवून देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन त्यांच्या सोबत आहेत असा विश्वास या रॅली द्वारे पटवून देण्यात येणार आहे.

सकाळी ७ वाजता राजीव गांधी भवन पासून सुरू होणारी ही रॅली पुढे मॅरेथॉन चौक – अशोक स्तंभ – मेहेर सिग्नल – सीबीएस – त्र्यंबक नाका – जिल्हा परिषद भवन ते ए टू झेड सायकल्स येथे समाप्त होईल. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल सरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे.

नेहमीच चांगले उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने जून महिन्यात पंढरपूर सायकल वारीचे आयोजन केले आहे. या सायकल वरीसाठीही या दिव्यांग सायकलिस्टना आमंत्रित करण्यात येऊन वारीचे महत्व वाढवता येणार आहे.

या सर्व दिव्यांग सायकलिस्टचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांनी केले आहे. ही राईड यशस्वी करण्यासाठी प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, कुतबी मर्चंट आदी प्रयत्न करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.