Nashik Coronavirus Suspect Negative सहावे संशयीतही कोरोनासाठी निगेटिव्ह

नाशिक : शहरामध्ये दुबई येथून आलेल्या २३ वर्षीय प्रवाश्याला घसा दुखून श्वास घेण्यास त्रास असल्याने त्या दि . १० मार्च २०२० रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल झाले होते. त्यांच्या घशातील स्त्राव तपाणीसाठी पुणे येथे पाठविला होता. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालेला असून तो निगेटिव्ह आहे. Nashik Coronavirus Suspect Negative

नाशिक महापालिकेच्या बिटको रूग्णालयात या युवतीची आई परीचारीका असून तीला त्रास होऊ लागल्याने आज सकाळीच याच रूग्णालयातील डॉक्टरांना दाखवण्यात आले.

त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय , नाशिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

तथापि नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. तसेच रंगपंचमी, गावोगावी भरणाऱ्या यात्रा व उरूसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. Nashik Coronavirus Suspect Negative

कलम 144 रंगपंचमी साठी- कोरोनाचा काहीही संबंध नाही

त्याचप्रमाणे नाशिक शहरात लागू करण्यात आलेली रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाशिकमध्ये मंगळवार (ता.१०) पासून सात दिवस १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याची माहिती समजते.

नाशिकमध्ये धुलिवंदन आणि १३ तारखेपर्यंत रहाड रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या काळात नाशिक पोलीसांनी खबरदारी म्हणून हे कलम लागू करण्यात आले आहे. यासंबंधित परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

इथे वाचा कलम 144 म्हणजे काय?

याचा कोरोनाशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करण्याची नामुष्की ओढवली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.