Nashik corona test lab कोरोना टेस्टिंग लॅबला केंद्राच्या आयुर्विज्ञानची मान्यता; पालकमंत्री, प्रशासनाच्या प्रयत्नांची फलश्रुती : जिल्हाधिकारी

पालकमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन व नाशिकरांच्या चिवट प्रयत्नाची फलश्रृती : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासन, समस्त नाशिककरांनी गेल्या आठ दिवसात घेतलेल्या चिवट प्रयत्नांची फलश्रृती म्हणजे आज आपल्या जिल्ह्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय तथा मेडिकल रिसर्च संस्थेत कोरोना तपासणी लॅबला केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली असून, आपण अवघ्या ७ दिवसात लॅबची स्थापना केली, आपण दातार जेनेटिकमधील अत्याधुनिक उपकरणे स्थापित केल्यामुळे त्याचा तपासणी दर आणि निष्कर्ष सुद्धा दर्जेदार असतील, त्यामुळे कोरोना विरोधी मोहिमेतली ही एक महत्वाची उपलब्धी जिल्ह्यासाठी असल्याची भावना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे. Nashik corona test lab


मांढरे म्हणाले की, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नागपूर कार्यालयाने आज जिल्ह्यातील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय तथा मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये  कोरोना तपासणी लॅबला सर्व निकषांवर पूरिपूर्ण ठरल्याबद्दल मान्याता दिली आहे.  नाशिक जिल्ह्यातील संभाव्य कोरोनाबाधितांची संख्या पाहता, पुणे व धुळे येथे प्रलंबित राहणारी रिपोर्ट संख्या पाहता नाशिकमध्ये स्वतंत्र कोरोना तपासणी लॅब असावी अशी मागणी वाढू लागली होती.

पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व सर्व लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आग्रही पुढाकार घेतला होता.  इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यावर ही लॅब स्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी व त्यांच्या टीमने ही जबाबदारी अत्यंत सचोटीने पार पाडत कमीत कमी दिवसात ही लॅब सर्व निकषांवर परिपूर्णपणे सुरू करण्यात यश मिळवले. आपल्या करोना विरोधी लढाईमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

They 're in possession of the Home Quarantine: Collector
corona virus

मी केवळ समन्वयक; प्रयत्न समस्त नाशिककरांचे : कुमार आशिर्वाद
इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये माझ्यावर वैद्यकीय क्षमता बळकटीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना टेस्टींग लॅब सुरू करता येवू शकते असे संकेत दिले होते.

तो धागा पकडून मी महाविद्यालयाच्या डीन डॉ. मृणाल पाटील, शहरातील दातार लॅबचे डॉ. दादासाहेब अकोलकर, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापन  यांच्यात समन्वय घडवून आणला, दातार व लॅब व अपोलो हॉस्पिटल यांनी या लॅबसाठी लागणारे त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व इक्विपमेंट देण्याची तयारी दर्शवली.

त्यानंतर लागणारे अन्य इक्विपमेंट महागडे तर होतेच परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत ते वेळेत मिळवणे हे एक आव्हान होते, त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

हे सर्व पार पडल्यानंतर आपल्याकडच्या मायक्रोबाॅयलाॅजिस्ट डॉ. निता गांगुर्डे व त्यांच्या दोन टेक्नियशियन यांना नागपूर येथे प्रशिक्षणासाठी गेल्या आठवड्यात पाठवण्यात आले, त्यांच्या प्रशिक्षणानंतर शनिवारी, रविवारी त्यांच्याकडून ब्लॅंक सॅंपल्सची चाचणी घेतली ती चाचणी दोन वेगवेगळ्या स्तरावर बरोबर निघाल्यानंतरच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने या लॅबला मान्यता दिली असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले. Nashik corona test lab

तसेच या सर्व समन्वयात मला तहसीलदार अनिल दोंडे व आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांचे व डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. मृणाल पाटील, दातार लॅबचे डॉ. दादासाहेब अकोलकर व अपोलो हॉस्पिटल यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याचे आशिर्वाद यांनी सांगितले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.