Nashik Corona Shivbhojan Thali जिल्ह्यात 13 तालुक्यात २७ ठिकाणी शिवभोजन थाळी

दररोज तीन हजार थाळ्या : गरिबांना दिलासा

नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हयातील १३ तालुक्यांत २७ केंद्रांवर शिवभोजन सुरू करण्यात आले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव मागविले आहेत. १ एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. Nashik Corona Shivbhojan Thali

गोरगरीबांना अतिशय सवलतीच्या दरात म्हणजे १० रूपयांऐवजी केवळ ५ रूपयांमध्ये मिळणार आहे. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योगधंदे या सगळयांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. कष्टकरी, कामगार, असंघटित कामगार, स्थलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर विद्यार्थी यांचे हाल होत असल्याने शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावरही ही केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसे निर्देशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. तीन महीन्यांकरीता शिवभोजन थाळी ५ रूपयांना दिली जाईल. तसेच जिल्हयांचा थाळयांचा कोटाही पाच पटीने वाढविण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा प्रशासनाने तालुका पातळीवर या योजनेचा विस्तार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून १ एप्रिलपासून जिल्हयात प्रत्येक मुख्यालयाच्या ठिकाणी २७ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याकरीता तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी यांची समिती नियुक्ती करण्यात आली असून एनजीओ, महिला बचत गट, रेस्टॉरंट, भोजनालय किंवा मेस यापैकी सक्षम भोजनालयाची तालुकास्तरीय समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे.

जिल्हयातील १२ तालुक्यात दोन तर निफाड तालुक्यात ३ अशा २७ केंद्रावर ३ हजार थाळीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. शिवभोजन थाळीची किंमत पाच रूपये करण्यात आली असून केंद्राना अनुदानही वाढवून देण्यात आले आहे.

शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रूपये आणि ग्रामीण भागासाठी ३० रूपये शासन देणार आहे. केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शक्य झाल्यास केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता पॅकिंगमध्ये हे भोजन देण्याच्या सूचनाही प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

केंद्र चालकांसाठी सूचना

  • भोजनालय दररोज निर्जंतुक करावे.
  • कर्मचार्‍यांनी मास्कचा वापर करावा.
  • सर्व भांडी निर्जंतुक करून घ्यावी.
  • गर्दी टाळण्याकरीता ग्राहकांमध्ये कमीत कमी अंतर ठेवणे.
  • केंद्रावर हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था असावी

Nashik Corona Shivbhojan Thali

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.