Nashik Containment Zone Covid19 शहरातील ‘हा’ परिसर पुढील 14 दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन

नाशिक शहरात दुसरा कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आलेल्या गोविंद नगर परिसरा केंद्रस्थानी ठेऊन तीन किमी त्रिज्येचा भाग काँटेन्मेंट झोन म्हणून मनपा आयुक्तांनी जाहीर केला आहे. Nashik Containment Zone Covid19

कोविड 19 प्रतिबंधात्मक कार्यवाही अनुषंगाने नाशिक जिल्हयामध्ये आपत्तीव्यवस्थापन कायदा व साथ रोग अधिनियम 1897 नुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कामकाज सुरु आहे . कोविड 19 बाधित क्षेत्रातुन आलेल्या नागरिकांची तपासणी करुन कोविड 19 बाधित आहे किंवा नाही हे निश्चित केले जाते.

आज दि. 4 रोजी मनोहर नगर, गोविंद नगर, नाशिक या परिसरात वास्तव्यात असलेला व्यक्ती कोविड – 19 कोरोना बाधित झाल्याचे समोर आले असून या रुग्णावर कोविड – 19 करीता निश्चित करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कोविड – 19 प्रतिबंधात्मक कार्यवाही अनुषंगाने शासन निर्देशानुसार आजाराच्या उद्रेकावर नियंत्रण मिळवण्याची रणनिती तयार करण्यात आलेली असुन त्यानुसार कोविड – 19 बाधित व्यक्तीचे निवासस्थान सुमंगल को. ऑप. सोसायटी, मनोहर नगर, गोविंद नगर, नाशिक केंद्रस्थानी ठेऊन तीन किलोमिटर त्रिज्येचा परिसर हे १४ दिवसांकरीता प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणुन मनपा आयुक्तांमार्फत घोषित करण्यात येत आहे.

त्यानुसार सदर प्रतिबंधित क्षेत्रामधिल व्यक्ती घर सोडुन बाहेर येऊ शकनार नाही. तसेच बाहेरचा कोणीही व्यक्ती (अत्यावश्यक सेवा वगळुन) प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही. सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यास अथवा उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम १८९७ आय पी सी आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेला अधिकार कसा?

महाराष्ट्र राज्यात दिनांक 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार, अधिसुचनेच्या दिनांकापासुन साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्याच्या खंड 2, 3 व 4 नुसार प्रदान करणेत आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राज्यात करोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी प्रसिद्ध करणेत आलेल्या नियमातील कलम 10 अन्वये आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

कोविड – 19 प्रतिबंधात्मक कार्यवाही अनुषंगाने नाशिक जिल्हयामध्ये आपत्तीव्यवस्थापन कायदा व साथ रोग अधिनियम 1897 नुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कामकाज सुरु आहे . कोविड 19 बाधित क्षेत्रातुन आलेल्या नागरिकांची तपासणी करुन कोविड – 19 बाधित आहे किंवा नाही हे निश्चित केले जाते. Nashik Containment Zone Covid19

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.