Nashik College Girl तरुणी कालव्यात मृतावस्थेत, खुनाचे गूढ उकलले

नाशिकमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. चुलतभावानेच तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे. (Nashik College Girl Murder case solved Cousin killed)Nashik College Girl

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत भागात तीन दिवसांपूर्वी दीपिका ताकाटे या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडला होता. पिंपळगाव नजीक आहेर गावच्या पाण्याच्या पाटात दीपिका ताकाटे मृतावस्थेत आढळली होती. दीपिकाची हत्या झाली, तिचा अपघात झाला की तिने आत्महत्या केली, हा संशय होता.

तरुणी संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने संशय

दीपिकाच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा असल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर दीपिकाची हत्याच झाल्याचं आता उघडकीस आलं आहे. दीपिका ताकाटे कॉलेजला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली होती. मुलगी संध्याकाळ होऊनही घरी का आली नाही, याचा शोध कुटुंबीयांनी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचा मृतदेह पालखेडमधील डाव्या कालव्यात आढळून आला.

साथीदाराच्या मदतीने चुलतभावाकडून हत्या

चुलत भाऊ विक्रम ताकाटे यानेच दीपिकाची गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आपल्या साथीदाराची मदत घेऊन आरोपीने दीपिकाच्या ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. दीपिकाच्या हत्यचे नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

दुसरीकडे, मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या तरुणाची इर्षेतून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नवी मुंबईत घडलेल्या हत्याकांड प्रकरणी आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात दुरावा वाढल्यानंतर आरोपीने नाशिकहून येऊन तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घणसोली भागातील झाडीत टाकला होता. (Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

बेपत्ता तरुणाचा शोध घेताना हत्येचा सुगावा

नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.

पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.Nashik College Girl

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.