जिल्हाधिकारी कार्यालय WhatsAppवर! २६० तक्रारी निकाली…

Nashik Collector Office WhatsApp Service 288 complaints received 260 solved

यातील केवळ 28 तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारदरांच्या तक्रारीचा निपटारा याद्वारे करण्यात येत आहे. मात्र नागरिकांच्या सोशल वर्तनामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. लोक या नंबरवर ही गूड मॉर्निंग, सणवाराचे मेसेजेस फॉरवर्ड करत आहेत.

नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या व्हॅट्अॅप नंबरवर जिल्हाधिकारी या उपक्रला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून या अंतर्गत 288 तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी 260 तक्रारींचे निवारण करण्यात येऊन निकाली काढण्यात आल्या. तर 28 तक्रारी प्रलंबित आहेत.

प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा नियमित निपटारा केला जात असल्याचे यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अतुर्लीकर यांनी सांगितले. महसूल विभागातील कुठलेही काम, प्रकरण कुठल्याही स्थितीत आहेत ही माहिती याद्वारे मिळू शकते. छोट्या कामांसाठी नागरिकांना खेट्या माराव्या लागतात. आपल्या प्रकरणाचे काय झाले, फाईल कुठपर्यंत आली याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती. विविध दाखले वगळता महसुली कामांसाठी ही एक व्हॅट्अॅप नंबर योजना सुरु केली आहे.

त्याअंतर्गत संबधित तक्रारदाराला आपला या नंबर केवळ आपल्या प्रकरणांची माहिती, अर्ज, किंवा त्याचा फोटो पुरावा म्हणून टाकल्यास पुढील दोन-तीन दिवसांत लागलीच त्याची सध्यस्थिती सांगितली जाते.

कोणत्याही तक्रार अथवा माहिती 15 दिवसाच्या आत देणे जिल्हाधिकाऱ्यांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे आवश्यक तेथे अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून काम प्रलंबित राहण्याची कारणे सांगत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी माहिती देण्यात येत आहे.

प्रशासन सकारात्मक :

जमीनी खरेदी-विक्रीच्या नोंदी, जुन्या नोंदी, रस्त्यांच्या बाबतची प्रकरणे, रेशनकार्डबाबत माहिती, सातबारा संबधित अद्यावत माहीती अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. त्यावर संबधिताला सकारात्मक उत्तरे देण्यात येत आहेत.

टाईमपास लोकांच्या फॉरवर्ड सवयीमुळे अधिकारी हैराण :

केवळ कामाशी काम ठेवत आपले इप्सित साध्य करून घेणे याखेरीज काही रिकामटेकडे लोक मात्र या WhatsApp नंबर वर गुड मॉर्निंग, सण उत्सवांच्या शुभेच्छांचे वर्षाव आणि हाय-हॅलोचेच संदेश येत असल्याने प्रशासनाची त्यामुळे चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. रात्री बेरात्री या नंबर वर मेसेज करत आहेत. नागरिकानी या सुविधेचा फायदा घेण्याऐवजी स्वत:हून केवळ कामापुरत्याच तक्रारी केल्यास प्रशासनालाही त्यावर तत्काळ निरसण करण्यास मदत होईल आहे. मात्र या लोकांना थांबवणार कोण आणि कसे?

Nashik Collector Office WhatsApp Service 288 complaints received 260 solved

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “जिल्हाधिकारी कार्यालय WhatsAppवर! २६० तक्रारी निकाली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.