कायाकल्प योजनेत नाशिक जिल्हा रुग्णालयाला प्रथम क्रमांकाचे ५० लाख रु. बक्षिस

नाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य जपले जावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या कायाकल्प योजनेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या योजनेच्या अंतर्गत तब्बल ५० लाखांचे बक्षीस रुग्णालयास घोषित झाले आहे. सोबत्तच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये असलेले इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण रुग्णालयांना देखील प्रत्येकी एक लाखांच्या बक्षिसासाठी पात्रता सिद्ध केली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. nashik civil hospital gets 50 lakh price kayakalp scheme

आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालये यांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कायाकल्प’ ही योजना सुरू केली. यामध्ये रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन , पूरक सुविधा, जंतुसंसर्ग रोकथाम, इतर महत्वाच्या सुविधा घटकांचा विकास करुन राज्यातील सर्वात उत्कृष्ट दवाखान्यात स्थान मिळवण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालय प्रयत्न करत होते.

जिल्ह्या रुग्णालयातील स्वच्छता, जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, रुग्ण,कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगणे याबाबत जनजागृतीची मोहीम जोरदार पणे राबवली होती. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आणि विश्वास देखील वाढला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील स्वच्छतेबाबत नियमित चांगल्या प्रतिक्रियादेखील प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे नाशिकचे जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयातील यादीत अग्रक्रमी पोहोचले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी सुद्धा नाशिकनेच हा पुरस्कार पटकावला होता.

जिल्हा आरोग्य केंद्रासह उपजिल्हा केंद्र असलेले कळवण, देवळा, वणी, त्र्यंबक, इगतपुरी, घोटी यांच्या सोबत जिल्ह्यातील ११ आरोग्य संस्थांना प्रत्येकी एक लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहे.

nashik civil hospital gets 50 lakh price kayakalp scheme

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.