वाहतुकीची ‘स्मार्ट कोंडी’ सोडविण्यासाठी एकेरीचा प्रयोग; आजपासून दोन दिवस अंमलबजावणी

स्मार्ट शहर होण्यासठी सज्ज असणाऱ्या नाशिक शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर पायलट प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम सुरु आहे. येथेच अर्ध्या रस्त्यावरून वाहतूक सुरु आहे. यामुळे वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. nashik city smart road temporary oneway traffic diversion october 2018

ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी (दि. २३) व बुधवारी (दि. २४) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्र्यंबकरोड ते अशोक स्तंभ या मार्गावर एकेरी वाहतुकीचा प्रयोग पुन्हा एकदा राबविण्यात येणार आहे.

शासकीय कन्या विद्यालय ते सीबीएसपर्यंतच्या रस्त्याचे काम या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येत आहे. त्यामुळे पलीकडील म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु आहे. याचबरोबर स्मार्ट रोडचे काम सुरू असल्याने हा संपूर्ण मार्ग वाहनासाठी ‘ना थांबा’ तसेच ‘नो पार्किंग क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ रस्त्यावर आजपासून वाहतुकीत बदल, स्मार्ट रस्त्याचे काम सुरू

वाचा कसा असणार आहे हा स्मार्ट रोड : काय काय असणार सुविधा —

या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषण आणि प्रत्येकाचा वाया जाणारा वेळ याबाबतच्या तक्रारी मध्ये वाढ झालेली लक्षात घेता त्र्यंबकरोड ते अशोक स्तंभ या मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविला जाणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन असे पोलिसांच्या वतीने करण्यात अाले आहे. nashik city smart road temporary oneway traffic diversion october 2018

असे आहेत वाहतुकीतील तात्पुरते बदल :

पंचवटीकडून त्र्यंबक नाक्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी :

रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस

तसेच त्र्यंबक नाक्याकडे जाण्यासाठी शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषद मार्ग

गंगापूररोड व रामवाडी पुलाकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी :

अशोक स्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल

तर दुसरा पर्याय अशेाक स्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस

तसेच अशेाक स्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषद-त्र्यंबकनाका-सातपूर

किंवा

गंगापूर नाका-कॅनडा काॅर्नर-टिळकवाडी मार्गे सीबीएस

मुंबईनाक्याकडून पंचवटीकडे येणाऱ्या वाहनांसाठी

मुंबईनाका-वडाळानाका-द्वारका-आडगाव नाका-काट्या मारुती-निमाणी

सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी

मायको सर्कल-जुना सीटीबी सिग्नल -एचडीएफसी सर्कल-कॅनडा कॉर्नर- जुना गंगापूर नाका-रामवाडी

किंवा ड्रिम कॅसल मार्गे पंचवटी

nashik city smart road temporary oneway traffic diversion october 2018
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.