राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केला प्रश्न : नासिक शहर स्मार्ट सिटी की स्वाइन प्लू सिटी

नासिक शहरात स्वाइन प्लू, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया ने थैमान घातले असून शहरातील सर्वच महापालिकेचे असो अथवा खाजगी रूग्णालयात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ सप्टेंबर महिन्यात 30 पेक्षा जास्त रूग्ण स्वाइन प्लू ने दगावले असून डेंग्यू आजारामुळे 5 पेक्षा जास्त रूग्ण दगावले. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराने इंदिरा गांधी पंचवटी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा पाटील यांना डास प्रतिबंधक काॅईल ( Dengue mosquito coil) राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. यावेळी डॉ. प्रशांत मेतकर, डाॅ. देवेंद्र बच्छाव उपस्थित होते. nashik city is a smart or swine flu city explain ncp women wing question
पंचवटी विभागातील स्वाइन प्लू, चे रूग्ण पंचवटीतील इंदिरा गांधी रूग्णालयात प्रथमोपचार करून डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात पाठविले जातात. नासिक शहरात एकमेव डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात स्वाइन प्लू रूग्णांसाठी कक्ष आहे. यामुळे रूग्णांवर तेथेच उपचार घ्यावे लागतात. डाॅ. झाकिर हुसेन रूग्णालया बरोबर इतर महापालिका रूग्णालयात ही स्वाइन प्लू कक्ष उघडावा जेणेकरून रूग्णांना त्रास होणार नाही. याच बरोबर सरकारी सुट्टी च्या दिवशी सुध्दा कमी अधिक प्रमाणात डॉक्टरांची उपस्थिती असावी. म्हणजे रूग्णांना दिलासा मिळेल. रूग्णालयाच्या अवतीभवती दोन वेळी डास प्रतिबंधक औषधं फवारणी व धुर फवारणी करावी. सफाई कर्मचारी कमी असल्याचे कारणे देऊ नये. गरज पडल्यास अधिक कर्मचारी नेमावे. नासिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटी कडे होत असतांना रूग्णांना स्वच्छ पाणी, आरोग्याची समस्या उदभवणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. अन्यथा नासिक शहर स्मार्ट सिटी ऐवजी स्वाइन प्लू सिटी म्हणून ओळखली जाईल अशी भिती नासिकरांना वाटते. nashik city is a smart or swine flu city explain ncp women wing question
निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पंचवटी विभागीय अध्यक्ष मनिषा अहिरराव, रजनी चौरसिया, ऊर्मीला भोइर, प्रतिक्षा जयस्वाल, उपस्थित होत्या.

nashik city is a smart or swine flu city explain ncp women wing question
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.