सिटी सेन्ट्रल मॉल : रस्त्यावर कार दुचाकी पार्किंग, नागरिक त्रस्त, राष्ट्रवादी आक्रमक

सुटीचे दिवस आणि इतर ही दिवशी नागरिक मॉल मध्ये आल्यावर पार्किंगचे पैसे वाचवण्यासाठी कार, दुचाकी रस्त्याच्या दुतर्फा लावतात, त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक, ध्वनी प्रदूषण आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. नागरिकांना नेहमीच होणारा हा त्रास बघता यावर ठोस आणि कठोर कारवाई करावी यासाठी नागरिक आक्रमक झाले आहे. हाच प्रश्न पोलिसांन पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रयत्न केला आहे सोबतच कारवीची मागणी केलीय.

नाशिक शहरातील भव्य अशा सिटी सेंटर मॉल च्या पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रास लक्षात घेऊन आज वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना निवेदन देऊन योग्य त्या करवाई ची मागणी करण्यात आली.निवेदन देताना- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष तुषार जाधव, सिद्धेश लाहंगी, स्वप्निल मोरे, निलेश भागवत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.