आयुक्त मुंढे इफेक्ट : शहराला २४ तास पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्राचे काम रखडले ठेकेदाराला दंड

जलशुद्धीकरण प्रकल्पातील घाण साफ करा अन्यथा निलंबन, जलशुद्धीकरण केंद्राचे अत्याधुनिकीकरण एक महिना रखडल्याने ठेकेदाराला दहा टक्के दंड

नाशिक :आज मनपा आयुक्त तुकाराम मुंढे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभ जलशुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याचे सुतोवाच मुंढे यांनी केले आहेत.त्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याला महत्व प्राप्त होतंय. बाराबंगला जलशुद्धीकरण प्रकल्पातील कामकाजाची पाहणी करण्यासाठी तुकाराम मुंढे स्वत: शिडीवर चढून, थेट पत्र्यावर जाऊन पोहचले. त्यामुळे मनपा अधिकारी अडचणीत सापडले होते. मात्र कसे तरी त्यांनी या दिव्यातून आपली सुटका करवून घेतली. Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

जलशुद्धीकरण केंद्रातील घाण- कचरा दोन दिवसात स्वच्छ झाला नाही तर निलंबित करु, अशा इशारा तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र स्वयंचलित केले जाणार आहे. निलगिरी बाग परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राचे अत्याधुनिकीकरण एक महिना रखडल्याने, संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करुन, ठेकेदाराला दहा टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

आजची आणखी एक महत्वाची बातमी : नाशिक पालिकेचा स्पीलओव्हर शून्यावर! मुंढेंच्या त्रिसूत्रीनुसार कामे रद्द केल्याचा परिणाम

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणी पुरवठा विभागामार्फत सुरु असलेल्या कामांची पहाणी सकाळी 9 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत केली.आयुक्तांनी प्रथम बारा बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्राची पहाणी केली. सदर पहाणीत आयुक्त सो. यांनी तेथील असलेल्या प्रत्येक जलशुध्दीकरण केंद्रातील इमारतीची व प्रत्येक युनीटची तसेच जलकुंभ व भुस्तर जलकुंभाची प्रत्यक्ष सर्व बाजुने पहाणी केली. Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

त्यात आयुक्त यांनी आवारात असलेल्या कचारा पालापाचोळा दररोज साफ का होत नाही म्हणुन अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले व तीन दिवसात परिसर स्वच्छ करण्याच्या सुचना व ताकीद दिली. त्याचप्रमाणे भुस्तर जलकुंभाची आयुक्त यांनी स्वत: त्यामध्ये उतरुन पाहणी केली व तेथील दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या तसेच जलकुंभाच्या आवारातील प्रत्येक इमारत, जलकुंभ एम.बी.आर. सम्प हे स्वच्छ करण्याचे वर्षाचे वेळापत्रक तयार करावे.

त्यानुसार टाक्यांची जलकुंभाची स्वच्छता झाली पाहीजे असे आदेशित केले.त्याच प्रमाणे आवारात पडलेल्या जुने करुन दोन आठवडयात त्याची विगतवारी करावी. व त्याची मान्यता घेवुन जुन अखेर पर्यंत प्रक्रीया पुर्ण करुन स्वच्छ करावी.तसेच आवारात नियोजन करुन या पावसाळयात रिकाम्या जागेत कडेने झाडे लावण्याचे  आदेशित केले.

परिस्थितीच्या बाजुने आयुक्तांनी पहाणी केली असता तेथे डेब्रीज उचलुन त्याची योग्य त्याठिकाणी व्हिल्हेवाट लावणचे आदेशित केले.  त्यानंतर मा. आयुक्तांनी जलशुध्दीकरण केंद्राच्या युनिट निहाय इनलेट चेंबर पासुन ते क्लोरिनेशन युनिट पर्यंत सविस्तर पहाणी केली.व त्यावर खालील प्रमाणे अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील गावठाण भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 24 * 7 पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रातुन होणार आहे.  24 * 7 पाणी पुरवठा करतांना CPHEEO, MOUD व WHO मार्गदर्शक तत्वानुसार पाण्याचा शुध्दता असणे व आवश्यक त्या दाबाने पाणी पुरवठा करणेसाठी योग्य उंचीचा एम.बी.आर असणे आवश्यक आहे. Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

तथापी बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रात एरीएशन फाऊंन्टेन नाही तसेच क्लॅरीफलॉक्युलेशन ब्रिज हे जुने झाले आहेत तसेच क्लोरीनेशन सिस्टीम जुन्या पध्दतीची आहे. यासाठी बारा बंगला येथे एरीएशन फाऊंटन घ्यावे, तसेच जलशुध्दीकरण केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी ॲटोमेशनची सर्व कामे व योग्य त्या उंचीचा एम.बी.आर. बांधण्याची तसेच फिल्टर हाऊस मधील बॅकवॉशचे पाणी वाया जाते त्यांचे रिसर्कयुलेशन करणेची यंत्रणा उभारणेची कामांच्या तातडीने प्राकलन करुन ती कामे स्मार्ट सिटी मधुन करावी असे मा. आयुक्तांना विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित केले. Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

त्यानंतर तिडके कॉलनी येथील सुरु असलेल्या जलकुंभाच्या कामाची पहाणी केली. तेथील कॉक्रीटमध्ये वापरण्यात येणाऱ्या खडी व वाळीची तपासणी केली असता कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना साईटवर असलेले मटेरिअलचे कामकाज तपासणी केली त्याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देता आले नाही.

त्यामुळे तेथे असलेली खडी रिजेक्ट करुन तातडीने उचलुन न्यावी तसेच निविदा स्पेसिफीकेशन प्रमाणे खडीच काँक्रीटसाठी वापरावी व वापरणे पुर्वी लॅबमध्ये व साईटवरही वेळोवेळी तपासणी करावी असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले व कनिष्ठ अभियंता उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना त्वरीत नोटीस काढावी असे आदेशीत केले.

त्यानंतर गोडेबाबा नगर टाकळी रोड येथील 20.00 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ पाहणी केली. त्यामध्ये त्यांनी प्रथम वर्क आर्डर विचारली वर्क आर्डरची त्यांनी पाहणी केली असता कामाची मुदत संपल्यानंतरही काम पुर्ण झाले नसल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरले व कामाचे मक्तेदारास निविदा अटी शर्तीनुसार 10 टक्के दंड लावणेचे आदेशित केले.

तसेच त्यांनी आजूबाजूचा सर्व परिसर फिरुन ज्या ठिकाणी कचरा पडला होता. त्या ठिकाणचा कचरा शेजारच्या प्लॉट धारकाने टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर कारवाई करणेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागास कळविण्यास सांगितले. तसेच त्याठिकाणी असलेल्या विहिरीवर जी झाडे उगवली होती ती सगळी साफसफाई करुन तसेच परिसरातील सर्व कचरा साफसफाई करण्यास तातडीने आदेशित केले.

त्यानंतर आयुक्तांनी औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग येथील 50 एम.एल.डी. क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्राची पहाणी केली. सदर केंद्राची पहाणी करतांना प्रत्यक्ष जलशुध्दीकरण केंद्राचे काम पहाणारे कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यात फिल्टर ऑपरेटर क्लोरिनेशन युनीट ऑपरेटर व पंप ऑपरेटर यांना प्रश्न विचारुन माहीती घेतली. त्यात एका पंप ऑपरेटर कर्मचाऱ्यास तेथील संपुर्ण माहीती नसल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी दोन दिवसात तेथील कर्मचाऱ्यांना संपुर्ण प्रशिक्षण देण्याचे आदेशीत केले. Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

त्याचप्रमाणे सदर जलशुध्दीकरण केंद्राचे सुरु असलेले ॲटोमेशनच्या कामाची पहाणी केली त्यात काही सुधारणा करण्याच्या सुचना आयुक्त यांनी केल्या व सदर कामाची नस्ती तपासली असता ॲटोमेशनच्या कामास विलंब झाल्याने नाराजी व्यक्त केली. मक्तेदारावर 10 टक्के दंडाची कारवाई करावी व मे अखेर काम पुर्ण करण्याचे आदेश मा. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. जलशुध्दीकरण केंद्रातील कार्यालय व  प्रयोगशाळेची पहाणी केली.

प्रयोगशाळेत सुधारणा करणेचे सुचित केले व तेथील कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये तंबाखुची पुडी सापडली व त्यावर आयुक्त यांनी तेथील कर्मचारी मनपाचे कनिष्ठ अभियंता यांना धारेवर धरुन मक्तेदारावर कारवाई करावी व कनिष्ठ अभियंता यांचे एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश दिले. Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

त्यानंतर आयुक्त यांनी सिडको विभागातील इंद्रनगरी येथील सुरु असलेल्या जलकुंभाच्या कामाची पहाणी केली व तेथे अधिकारी व मक्तेदारास कामाची गती वाढवुन काम 18 महीन्याऐवजी 12 महीन्यात पुर्ण करणे व त्यादृष्टीने फेर नियोजन करुन पर्ट चार्ट सादर करणेस व त्यानुसार काम करण्याचे अधिकारी व मक्तेदारास आदेशित केले तसेच सदर जागेतील स्वच्छता मक्तेदाराने ठेवण्याचे निर्देश दिले व तेथील उर्वरीत जागेत पार्कींग व्यवस्था व ग्रील लॉन व जेष्ठ नागरीकांसाठी सिटआऊट करावे या दृष्टीने नियोजन करण्याचे आयुक्त यांनी आदेशीत केले.

Nashik city 24hours water tukaram mundhe visit water purification plant

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.