nashik CIDCO murder सिडकोत भर दिवसा खून , आरोपीचा शोध सुरू

नाशिक येथील सर्वाधिक  रहिवासी क्षेत्र  असलेल्या सिडको परिसर आज हादरले आहे. आज दुपारी सिडकोत भर दिवसा हत्या झाली आहे.  सिडको परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना आज (दि.१२) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.nashik CIDCO murder The search for  accused

योगेश तांदळे असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.प्राथमिक माहितीनुसार, मुलींची छेड काढल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे समजते आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली असून तपासकार्य सुरु केले आहे. आज (दि.१२) दुपारी साडेतीनच्या सुमारास शाईन या दुचाकीवर आलेल्या दोघांनी तांदळे याला धारदार शस्राने भोसकून जागीच ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे. खून झालेला युवक हा मोरवाडी गावातील असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.nashik CIDCO murder

द्वारका परिसर खून प्रकरणातील  संशयितांची धिंड

आकाश रंजवे खूनप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयितांची गुरुवारी (ता. ११) जुने नाशिक परिसरातून धिंड काढली. अभय बेनवाल, पवन टाक, सतीश टाक, आकाश टाक, मनीष डुलगज, निखेलेश्‍वर टाक, शिवम पवार अशा सात संशयितांची वडाळा नाका, संत कबीरनगर, मातंगवाडा, राजवाडा, चौकमंडई भागातून धिंड काढली. संशयितांच्या कुटुंबीयांतील महिलांनी एकत्र येत पोलिसांच्या कृतीचा विरोध केला होता. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. बघ्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती..आकाश रंजवे खूनप्रकरणी मुख्य संशयित विशाल बेनवाल याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भद्रकाली पोलिसांनी घाटकोपर (मुंबई) येथून त्यास ताब्यात घेतले. तडीपार असताना त्याचा शहरात वावर होता. सोमवारी (ता. ८) द्वारका परिसरात पोलिस खबरी असल्याच्या वादातून आकाश रंजवे याचा खून झाला होता. मुख्य संशयित विशाल बेनवाल फरारी झाला होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.