नाशिकमध्ये एशियन पेण्ट्सच्या एपी होम्स बुटिक या अत्याधुनिक मल्टी-कॅटेगरी डेकोअर शोरूम

नाशिकमधील पहिले एपी होम्स बुटिक स्टोअर ग्राहकांना घरासंबंधीच्या सर्व सजावट सेवा एकाच छताखाली सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे ~

अत्यंत वेगाने बदलत जाणारी मानसिकता आणि मागण्या लक्षात घेता, एशियन पेण्‍ट्स या रंग आणि सजावट कंपनीने नाशिकमध्ये आपल्या पहिल्यावहिल्या एपी होम्स बुटिक या अत्याधुनिक मल्टी-कॅटेगरी डेकोअर शोरूमचे उद्घाटन केले आहे. नाशिकमधील इंदिरा नगर येथील वसंतपाडा कॉलनी येथे प्लॉट क्रमांक ८ वर हे शोरूम थाटण्यात आले आहे. एकाच छताखाली दर्जेदार उत्पादने आणि सेवा ग्राहकांना सहज व त्यांच्या मागण्यांनुसार मिळाव्यात, यासाठी हे दालन सज्ज झाले आहे.

नाशिक हे अत्यंत वेगाने विकसित होत असलेले शहर असून नव्या कल्पना आणि संकल्पनांना येथे मोठी मागणी आहे. संरक्षण, अंतराळविज्ञान उत्पादन व मोठ्या उद्योगधंद्यांच्या बाबतीत हे शहर नावारूपाला येत आहे. घर सजावट आणि घरांमधील सुधारणा या बाबतीतही नाशिकमध्ये ग्राहकसंख्या मोठी आहे. नाशिकमध्ये यापूर्वी गृह सजावट क्षेत्रात एशियन पेण्ट्सच्या उत्पादनांना व सेवांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने, या शहरात नवीन एपी होम्स बुटिक थाटले जाणे स्वाभाविक होते.

गृहसजावट व डिझाईन क्षेत्रात ग्राहकांच्या मागणीनुसार, पेण्ट्स, वॉलपेपर्स, किचन्स, बाथ, फ्लोअरिंग तसेच, सॉफ्ट फर्निशिंग हे प्रकार व्यापक प्रमाणात उपलब्ध असलेले एपी होम्स बुटिक हे एकमेव दालन आहे. ग्राहकांना या स्टोअरमध्ये अद्वितीय रिटेल अनुभव घेता येणार असून प्रत्येक श्रेणीत येथे विविध कल्पना व शक्यता अंमलात आणल्या गेल्या आहेत. सजावटीच्या विविध शक्यता ग्राहकांना डोळ्यासमोर आणता याव्यात, यासाठी स्टोअरमध्ये मोफत ३डी व्हिज्युअलायझेशनसह मोफत सल्लागारी सेवाही उपलब्ध आहे. एपी होम्स बुटिक शोरूममध्ये ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी सजावट क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित राहत असून संकल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंत गृहसजावटीच्या सर्व पायऱ्या येथे पूर्ण होऊ शकतात.

ग्राहकांच्या कल्पनांनुसार नवीन डिझाईन्स बनवण्यासाठी तसेच त्या डिझाईनची अंमलबजावणी करण्यासाठी एपी होम्स बुटिकमध्ये डिझाईन समुदायातील व्यावसायिकांना मदतही पुरवली जाते. या स्टोअरच्या माध्यमातून एशियन पेण्ट्सची एपी होम स्टोअर्स देशभरात आठवर पोहोचणार आहेत.

या नव्या स्टोअरच्या सादरीकरणाबद्दल बोलताना एशियन पेण्ट्स लिमिटेडचे सीओओ अमित सिंगलम्हणाले, ग्राहकांची घरे आणि त्यांचे स्पेस क्रांतीकारी पद्धतीने बदलण्यासाठी व त्यांना अविस्मरणीय अनुभव प्रदान करण्यासाठी एशियन पेण्ट्स कटीबद्ध आहे. सर्वांत प्रेरणादायी आणि आकर्षक होम डेकोअर ब्रॅण्ड म्हणून पुढे येण्याचे आमचे स्वप्न आहे. ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर केवळ कल्पनेतच नव्हे तर, प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही आमच्या अत्याधुनिक एपी होम्स शोरूम्स मदत करतात. एकाच छताखाली ग्राहकांना सर्व सोल्यूशन्स मिळावीत, हे आमचे ध्येय आहे. इतर बाजारपेठांमध्ये आम्हाला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद आला असून नाशिकमधील ग्राहकांनाही आम्ही तो आनंद देणार आहोत.

एशियन पेण्ट्स बाबत

१९४२ साली स्थापन झालेली एशियन पेण्ट्स ही वार्षिक १६८.७ बिलियन रुपये टर्नओव्हर असलेली अग्रेसर पेण्ट कंपनी आहे. १६ देशांत या कंपनीचा व्यापार चालत असून जगभर कंपनीची २६ रंग उत्पादन केंद्रे आहेत. तर, ६५देशांत ही कंपनी सेवा पुरवते. पेण्ट उद्योगक्षेत्रात एशियन पेण्ट्स ही कायमच अग्रेसर असलेली कंपनी असून भारतात आता कंपनीने कलर आयडियाज, होम सोल्यूशन्स, कलर नेक्स्ट आणि कीड्स वर्ल्ड अशा नव्या संकल्पना सादर केल्या आहेत. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.