नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

नाशिक :नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ शनिवारी बरखास्त करण्यात आले आहे. याआधी संचालक मंडळाला जिल्हा निबंधकांनी ४५/१ची नोटीस बजावली होती. यानुसार सहकार खात्याने संचालक मंडळावर ठपका ठेवत बरखास्तीची कारवाई केली आहे. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंधरा दिवसांनी प्रशासक अपर निबंधक कामकाज सांभाळणार  असल्याचे जिल्हा निबंधक निळकंठ करे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे समिती सभापती शिवाजीराव चुंभळे यांनी जिल्हा निबंधकांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने बरखास्तीच्या कारवाईपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतीत पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुदत संचालक मंडळाला दिली आहे.

कर्जाच्या रकमेची थकबाकी, अंशदानाची रक्कम मुदतीत न भरणे, वकिलांचे शुल्क, विविध न्यायालयीन कामकाजावरील खर्च, अनावश्यक जाहिरातींवर केलेला खर्च, अनावश्यक रोजंदारीने कामगार नियक्ती, थकीत सुपरव्हिजन शुल्क, राज्य बाजार समिती संघाची थकविलेल्या रकमेचा मुदतीत भरणा न करणे, अशा एकूण दहा कारणांच्या आधारे बाजार समितीच्या संचालक मंडळाला नोटीस बजावण्यात आली होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.