देशाचे प्रधानमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर,’मेट्रो नियो’च्या भूमिपूजनाची शक्यता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. विधानसभेपूर्वी त्यांचा हा दौरा फार महत्व पूर्ण मानला जात आहे. कारण लोकसभेला मोदींच्या एका समभेने भाजप आणि शिवसेनेला मोठा फायदा झाला होता. त्यामुळे भाजपाचे मताधिक्क्य वाढलेच सोबतच शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी इतिहास रचत दुसऱ्या वेळी खासदार होण्याचा मान मिळावला आहे.

Example of Metro

राज्याचे मुखयमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मनपा निवडणुकीत मनसेच्या सत्तेला सुरुंग लावला आणि भाजपाचे नगरसेवक निवडणून आले होते. सोबतच फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतो असे सांगितले होते. मात्र त्यानंतर नाशिकला हेवे तसे नवीन कोणतेही प्रोजेक्ट आले नाहीत. उलट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना मोठा विरोध नगरसेवक व आमदारांनी केला होता. त्यामुळे चांगला अधिकारी नाशिकचे गमावला होता.

तर दुसरीकडे स्मार्ट सिटीमध्ये मध्ये भाजपाला कोणतीही लक्षवेधी कामगिरी करता आली नाही, राज ठाकरे यांच्या हाताने सुरु झालेले प्रकल्पच त्यांनी स्मार्ट सिटी मध्ये दाखवले आहेत. तर एकहाती सत्ता असून सुद्धा कोणताही मोठा प्रकल्प एकाही आमदाराला नाशिकला आणता आला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक नाराज आहेत. फक्त मोदींच्या शब्दावर निवडणून आलेले लोकसेवकांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही.

औद्योगिक मंदीचे वारे वाहत असतांना नाशिकच्या अंबड, सातपूर व माळेगाव या औदयोगिक वसाहतींना मंदीचे चटके बसले आहेत. याशिवाय वाहन उद्योगावर अवलंबून असलेले अनेक लहान मोठे उद्योग, व्हेंडर बेरोजगार झाले आहेत. आगामी दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्व्भूमीवर उद्योगासाठी एखादे बेलआऊट पँकेज किंवा मोठी सवलत मोदी जाहीर करतात का ? या कडे नाशिकचे उद्योजक लक्ष देऊन आहेत.

Onion

कृषी क्षेत्राचा विचार केला असता शेतकरी कर्जमाफी बरोबरच, जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी वर्गासाठी काही धोरण ( कांदा हमी भाव ) वा एखादी योजना मोदी घेऊन येतात का हे विशेषकरून पहावे लागणार आहे. स्थानिक प्रश्नांचा विचार केला असता शहर वाहतुकीचा गाजत असलेला प्रश्न मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या उपस्थिती कसा सोडवता की थेट नाशिकच्या नागरिकांना खास बसच घेऊन येतात याकडे सामान्य नाशिकर पाहत आहे. ( नियो मेट्रो प्रकल्प २०२३ पूर्ण होणार आहे, त्या मधल्या काळात सार्वजनिक व्यवस्था हवी आहे.)

त्यामुळे नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या कडून नाशिकची मोठी घोषणा करवूंन घेण्याची शक्यता आहे. सोबतच नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषण, कांद्याला भाव न मिळणे आणि दुष्काळ स्थिती यामुळे शेतकरी देखील नाराज आहे. त्यामुळे शेतीसाठी काही घोषणा होणार का असे ही पाहिले जाते आहे.

सर्व विभागांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडा : महाजन
पं
तप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी एकत्रितपणे आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

सदर बैठकीत पंतप्रधान यांच्या दौऱ्याअंतर्गत सुरक्षा, निवास वाहतूक, भोजन आदी व्यवस्था बाबत चर्चा करुन संबधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे. त्याचप्रमाणे अखंड वीजपुरवठा, दुरध्वनी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक सज्ज ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.