१० हजारांची लाच : नांदगाव नगरपरिषदेच्या लेखा परिक्षक आणि शिपायाला अटक

नांदगाव : कोणतीही अडचण नसताना लेखा परिक्षण अहवाल (Audit Report) सादर करण्यासाठी लाच घेणाऱ्या नांदगाव नगरपरिषदेच्या कनिष्ठ लेखा परिक्षक आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हातोहात पकडले आहे. nandgaon nagarparishad bribe case auditor peon arrested acb nashik

पाणीपट्टीच्या पावत्या व इतर दप्तराचा तपासणी अहवाल विनाआक्षेप पुर्ण करुन देण्यासाठी कनिष्ठ लेख परीक्षक संजय बुरकुल याने पालिकेच्याच वसुली अधिकाऱ्याकडे पैसे मागितले. नांदगाव नगरपालिचे सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण चालू आहे.

यासंबंधी तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नगरपालिका आवारात दुपारी दोन वाजता लाचेचे १० हजार रुपये घेताना सप्ला रचून लेखा परिक्षक संजय बुरकुल व शिपाई राजेंद्र पाटील हातोहात पकडण्यात आले.

या कारवाईत पोलिस उपअधीक्षक शंकर कांबळे, पोलिस हवालदार सुभाष हांडगे, राजू गीते, पवार यांनी सहभाग घेत लाचखोरांना अटक केली आहे.

nandgaon nagarparishad bribe case auditor peon arrested acb nashik

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.