व्हॅलेंटाईन डे डिव्हाईन सायक्लोथॉन उत्साहात, दिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त

नाशिक : समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, जागृती व्हावी त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एसकेडी ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ’डिव्हाइन सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकचे पोलीस आयुक्त ​डॉ. रवींद्रसिंग सिंग​ल, ​गुरु गोविंदसिंग फाउंडेशनचे गुरदेवसिंग विर्दी,​ नगरसेविका हेमलता पाटील, प्रियांका घाटे आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

नाशिक  सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या डिव्हाईन सायक्लोथॉनचे सलग तिसऱ्यावर्षी आयोजित करण्यात आले होते. या डिव्हाईन सायक्लोथॉनमध्ये ८० हुन अधिक अंध मुले-मुली,अस्थिव्यंग, मतीमंद, सेलेब्रल प्लासी, बहुविकलांग, डिफ-ब्लाइंड असे दिव्यांग स्त्री पुरुष सहभागी झाले.

nab maharaashtra nashik cyclists valentine day divine cycle ride, दिव्यांग सायकल रॅली, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र, chhatrapati puraskar, छत्रपती पुरस्कार,दिव्यांग स्नेहभाव, डिव्हाइन सायक्लोथॉन

महात्मानगर क्रिकेट ग्राउंड ते भोंसला मिलिटरी स्कुल गेट, कॉलेज रोड अशा मार्गावर झालेल्या या डिव्हाइन सायक्लोथॉनमध्ये दोन चाकी सायकल्स टँडम सायकल्स, लहान मुलांसाठी तीन चाकी सायकल्स, व्हीलचेअर वापरण्यात आल्या. नाशिक सायकलीस्टच्या सदस्यांनी स्वतःच्या सायकल्स यावेळी उपलब्ध करून दिल्या.

गेल्यावर्षी नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी १० दिव्यांगांनी स्वतंत्रपणे सायकल चालवली. सायकल चालविण्याइतपत काहींना प्रशिक्षण आणि सराव घेण्यात आला होता.

या सायक्लोथॉन दरम्यान प्रत्येक दिव्यांग सायकलीस्टच्या सोबत २ व्यक्ती पूर्णवेळ साथ देण्यासाठी उपलब्ध होते. यावेळी टाळ्या आणि चुटक्या यांच्या दिशेने दिव्यांग सायकलीस्ट सायकल चालवताना दिसत होते. यावेळी मदत करणारे नॅब आणि नाशिक सायकलीस्टचे सदस्य या दिव्यांगांच्या दुनियेत हरवून जात सायक्लोथॉन पूर्ण करण्यास मदत करताना दिसले.

फोटो गॅलरी

​यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते साहसी सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन बंधूंचा विशेष सत्कार नाशिक सायकलिस्टच्या वतीने करण्यात आला.​ यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, उपक्रम यशस्वी होण्यासाठी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव शाम पाडेकर, मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, मंगला कलंत्री, प्रशासकीय संचालक विनोद जाधव,​ डॉ. सिंधू काकडे, विश्वस्थ अशोक बंग, एसकेडी ग्रुपचे संजय देवरे, सीए अंकुर सुराणा, ​नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, सचिव नितीन भोसले, स्नेहल देव, वैभव शेटे, नीता नारंग, पल्लवी पवार आदी उपस्थित होते.

***

आमचे फेसबुक पेज लाईक करा : FB/NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.