My familyमाझे कुटुंब माझी जबाबदारी सुमारे १९ लाख नागरिकांची तपासणी

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात शहरातील ६ विभागांमध्ये दि.२२/०९/२०२० रोजी एकाच वेळी करण्यात आली आहे.या मोहिमेच्या  माध्यमातून कोविड मुक्त नाशिक करण्याच्या दृष्टीने दि १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्व घरांना भेटी देऊन सारी व इली या आजारा सोबत  इतर रुग्ण शोधणे बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.यासाठी शहरात ८०० पथकांच्या माध्यमातून  साडेचार लाख घरांतील सुमारे १९ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मा.मनपा आयुक्त श्री.कैलास जाधव यांनी दिली.My family
शासन निर्देशानुसार नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम राबवण्याचे सुचित करण्यात आले आहे. ही मोहीम दिनांक १५ सप्टेंबर ते २५  ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये दोन टप्प्यात होणार असून यामध्ये नाशिक शहरातील घरांना भेटी देऊन तेथील व्यक्ती तसेच सारी व इली या आजारा सोबत  इतर रुग्ण शोधण्याचे काम या सर्वेक्षणात केले जाणार आहे.त्यामध्ये मधुमेह,ह्रदयरोग,कर्करोग, किडनी आजार,अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजाराबाबत माहिती  घेतली जाणार आहे.नाशिक शहरातील सुमारे १९ लक्ष नागरिकांची तपासणी केली जाणार असून सुमारे साडेचार लाख घरांची तपासणी या माध्यमातून होणार आहे यासाठी सुमारे ७९४ पथके नियुक्त करण्यात आलेले आहेत.
नाशिक पूर्व विभागातील ६ यूपीसीएस सेंटरमधील  १५२ पथकाच्या माध्यमातून  ८३,६०१ घरांमधील ३,६१,०६६ नागरिकांची तपासणी होणार आहे.नाशिक पश्चिम विभागातील ४ यूपीसीएस सेंटरमधील १०५ पथकाच्या माध्यमातून  ५१,३१२ घरांमधील २,३२,४९९ नागरिकांची तपासणी होणार आहे.पंचवटी विभागातील ५ यूपीसीएस सेंटरमधील ९९ पथकाच्या माध्यमातून ५६,७४९ घरांमधील २,६४,२५६ नागरिकांची तपासणी होणार आहे.नाशिकरोड विभागातील ५ यूपीसीएस सेंटरमधील  १४३ पथकाच्या माध्यमातून  ६०,७४३ घरांमधील ३,१०,७४० नागरिकांची तपासणी होणार आहे.नवीन नाशिक विभागातील ६ यूपीसीएस सेंटरमधील  १५४ पथकाच्या माध्यमातून  १,०५,८५० घरांमधील ४,२४,७७० नागरिकांची तपासणी होणार आहे.सातपूर विभागातील ४ यूपीसीएस सेंटरमधील  १४१ पथकाच्या माध्यमातून  ८२,३०३ घरांमधील ३,०८,३६२ नागरिकांची तपासणी होणार आहे असे एकूण शहरातील ४,४०,५५८ घरातील १९,०१,६९३ नागरिकांची ७९४  पथकाच्या माध्यमातून तपासणी होणार असून पथकाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा मा.आयुक्त श्री.कैलास जाधव यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत व सँनीटायझरचा वापर करावा त्रिसूत्रीचा वापर करावा.घरी असल्यावर साबणाने हात धुवावेत या नियमांचे काटेकोर पालन करावे जेणे करून आपण कोरोना मुक्त नाशिक करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास मा.आयुक्त श्री.कैलास जाधव यांनी व्यक्त केला आहे.My family
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.