दराडे यांच्या विजयात भुजबळ यांचा हात, दराडे यांची कबुली

नाशिक : माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य झाला आहे अशी कबुली स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत निवडून आलेले शिवसेना विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी सह अनेकांनी मला मदत केली असा गौप्यस्फोट त्यांनी आज केला आहे.my election win because help chagan bhujbal narednra darade

तर दुसरीकडे सर्वाधिक मतदान असलेल्या भाजपने राष्ट्रवादीचे उमदेवार शिवाजी सहाने यांना पाठबळ  दिले होते मात्र तरीही प्रत्यक्ष निकालात १९३ मते अधिक मिळाली आहे. तर दुरीकडे पालकमंत्री गिरीश महाजन या निवडणुकीत कोठेही दिलसे नाहीत हे विशेष. त्यामुळे शिवसेनेन हे गणित जमवले कसे असा प्रश्न पडलेला असतांना भुजबळ फॅक्टर मुळेच हे गणित बदलेले असे चित्र समोर आले आहे.

भुजबळ यांनी मला मदत केली अशी स्पष्टोक्ती नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दराडे सुद्धा येवला भागातील आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाने यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.तेव्हा मतभेद विसरा तयारीला लागा असे भुजबळ म्हणाले होते. तर मतदानाच्या आधी मिलिंद नार्वेकर भुजबळ यांना भेटले होते. तेव्हाचा सर्व गणित बदलेले गेले होते. भुजबळ यांची पकड अजूनही स्थानिक राजकारणावर आहे असे समोर येतय.

विश्वास – अतिविश्वास

शिवसेने उमदेवारी घोषित केली नसतानाही शिवाजी सहाने यांनी प्रचार सुरु केला होता. यावर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत बडतर्फ केले. तर ऐनवेळी अनेकांना डावलून राष्ट्रवादीतून त्यांना लगेच उमेदवारी दिली गेली. त्यामुळे नाराजी पसरली. त्यात भुजबळ यांना जामीन मिळाला आणि नाशिकच राजकारण बदलायला सुरुवात झाली. शिवाजी सहाने यांना असे वाटले की आघाडीची मते मला पूर्ण मिळतील आणि भाजपने साथ दिल्याने विजय निश्चित होईल. तर दुसरीकडे नरेंद्र  दराडे यांनी  गाठी भेटी चालू ठेवत आपला मतदार पक्का केला. त्यामुळे काहींसा फरक पडला. ऐनघटकेचा उमेदवार आनल्याने नाराज राष्ट्रवादी, भुजबळ यांचा प्रभाव आणि भुजबळ यांचे शिवसेनेला थोडासा भावनिक मुद्दा यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाने यांना पराभाव पत्करावा लागला आहे. राष्ट्रवादीने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, भुजबळांनी शिवसेनेला मदत केली नाही तर भाजपने राष्ट्रवादीला मते देण्याचे जाहीर केल्यानंतरही शिवसेनेला मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र जवळ येणारी लोकसभा- विधासभा निवडणूक पाहता कोणताही विरोधक अथवा बंड नको म्हणून छगन भुजबळ यांनी तयारी सुरु केली आहे.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Name and Place  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.