नाशिक : मेरी लिंक रोड परिसरातील लक्ष्मी अपार्टमेंट इमारतीत घरात दोन मृतदेह आढळून आले असून दिराने प्रथम वहिनीचा गळा आवळून खून करत आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा सर्व प्रकार आज पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज असून घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकुमार यांची पत्नी प्रियासिंग विकासकुमार शर्मा(२७) या महिलेचा मृतदेह जमिनीवर तर त्यांचा विकासकुमार यांना लहान भाऊ श्रीरामकुमार सातेंद्र शर्मा (२५) याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला आहे. प्रियासिंघ यांच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खून दिसून आल्याने दिराने प्रथम भाऊजाईचा गळा आवळून खून करत स्वतः आत्महत्या केल्याचाप्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेचे कोणतेही कारण समजू शकले नसून संध्याकाळी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत. घटनेचे काही मोठे कारण समोर येण्याची शक्यता असून बाहेरगावी असलेले विकासकुमार शर्मा पुन्हा घराकडे येण्यास निघाले असून पंचवटी पोलिसांनी तात्पुरता आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.