देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इगतपुरी येथील डाक बंगला अँम्बेसिटर हॉटेलसमोर त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Murder of criminal
देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे ( वय – 42 ) याची जुनी कुरापत काढण्यासाठी एका टोळक्याने तिक्ष्ण हत्याराने पोटावर, छातीवर, तोंडावर केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी (दि.18) रात्री 10.45 वाजता हत्या झाली.इगतपुरी येथील डाक बंगला अँम्बेसिटर हॉटेलसमोर घरी जात असताना त्याच्यावर हल्ला झाला.
सहा वर्षांपुर्वी इगतपुरीतील कुख्यात गुन्हेगार डेविड मॅनवेल याचा कल्याण भागात खून झाल्याच्या कारणावरुन संशयित म्हणून राजू धामणे हा तळोजा जेलमध्ये आहे. या खूनाचा बदला म्हणून संजय धामणेचा खून झाल्याची परिसरात चर्चा आहे. संजय धामणेवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मृत संजय धामणे याचा भाऊ राजू धामणे हा सहा वर्षांपूर्वी कल्याण येथे हत्या झालेल्या डेव्हिड पॅट्रीक मॅनवेल हत्येप्रकरणी तळोजा कारागृहात आहे.
त्याला तारखेला कोर्टात आणले असता मयत संजय धामणे यांचा भाचा दीपक दत्तात्रय पाटील यास संशयित आशा पॅट्रीक मॅनवेल यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आशा मॅनवेल यांनी चार संशयितांना चिथावणी देऊन कोणालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती.
इगतपुरी पोलिस ठाण्यात शनिवार (ता.19) दिपक दत्तात्रय पाटील ( वय 32 ) रा.नाशिकरोड यांच्या तक्रारीवरुन संशयित अजय पॅट्रिक मॅनवेल, सायमन उर्फ पापा पॅट्रिक मॅनवेल, अजय उर्फ टकल्या पवार, आशा पॅट्रिक मॅनवेल सर्व (रा.इगतपुरी), राजकुमार भारती (रा.कल्याण) यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असुन यातील आशा पॅट्रिक मॅनवेल हिला ताब्यात घेतले आहे. बाकी संशयितांचा कसुन शोध सुरु आहे.Murder of criminal