अन्य खुनातील मुख्य साक्षीदार युवकाचा खून, रामवाडीतील घटना

नाशिक : प्रतिनिधी अन्य एका खुनातील मुख्य साक्षीदार असलेल्या युवकाचा धारदार शस्त्राने वार करत रामवाडी परिसरात खून करण्यात आला आहे. तीन ते चार लोकांनी एकत्र येत हा खून मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास केला आहे. या युवकास जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्राव झाल्याने बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. पंचवटी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.murder nashik ramvadi late night police files case

किशोर नागरे (२६, रामनगर, रामवाडी ) हा राहत्या रुमच्या बाहेर मोकळ्या जागेत उभा होता, तेव्हा रात्री तीन ते चार जनांच्या टोळक्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या कडील असेलेल्या धारधार शस्त्राने शरीर,पाठ, मान यावर जोरदार वार केले. यामुळे नागरे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांना घटना कळताच आर्व अधिकारी तेथे दाखल झाले, गंभीर युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.  काही दिवसांपूर्वी नवीन सीबीएस येथील तुळजा बार रेस्टोरॉण्ट येथे गुणाजी जाधव याच्यावर आणि नागरे वर जीवघेणा हल्ला झाला होता. यामध्ये गुणाजी जाधव मारला गेला तर नागरे वाचाला होता. जाधवच्या खुनातील नागरे मुख्य साक्षीदार होता. त्या अनुषंगाने सुद्धा पोलिस अधिक तपासा करत आहेत. सचिन नागरे यांनी   दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.murder nashik ramvadi late night police files case

घटनेची माहिती मिळताच गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, शांताराम पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, निरीक्षक दिनेश बर्डेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.murder nashik ramvadi late night police files case

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.