शिवाजी गार्डनमध्ये युवकाचा खून , सीसीटीव्ही फुटेजचा आधार

शहराच्या मध्यवस्तीतील परिसरातील शिवाजी गार्डनमध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून केला आहे. याठिकाणी सर्व पाच ते सहा युवक दारू पीत होते, यावेळी वाद झाला आणि यातून युवकाचा खून झाला आहे. आज संध्याकाळी ही घटना घडली आहे.

६ नोव्हेंबर रोजी सध्याकाळी शिवाजी गार्डनमध्ये चार ते पाच दारू पीत होते, त्यावेळी कोणत्या तरी कारणाने एकमेकांमध्ये जोरदार  वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेला आणि  पर्यवसान जबर   हाणामारीत झाले.  यामध्ये  मंगेश वामन जटघुले (वय 22, खंबाळे ता. सिन्नर) या युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी फौजफाट्यासह घटनास्थळी माहिती मिळताच लगेच दाखल झाले होते. पोलिसांनी लगेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. युवक सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील रहिवासी आहे. तो  केटरिंगचे काम करीत असल्याचे समजते. पोलिसांनी घटनेची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.