Municipal Commissioner महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे नागरिकांना आवाहन

नाशिक शहरात वर्षभरापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करीत आहे. 24 तास यंत्रणा कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी शासनाने घालून दिलेले नियम, तसेच घ्यावी लागणारी काळजी यासंदर्भात प्रबोधन करीत आहे. असे असतानाही काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा एकदा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.Municipal Commissioner

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कोरोनाबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भात आवाहन करताना म्हटले आहे, की आपण सर्वजण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहोत. कोरोना या साथीच्या आजाराविरुद्ध कार्य करीत आहोत, नाशिक शहरातील सर्व नागरिकांना याची जाणीव आहे; परंतु याचा अर्थ असा नाही, की आपण स्वतःची काळजी घेत असताना आपल्याजवळच्या लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र 24 तास कार्यरत आहेत.

आपणा सर्वांना विनंती आहे, की कृपया कोविडसंदर्भातील असलेल्या शासकीय नियमानुसार उचित वागणुकीचे अनुसरण करा. तोंडावर मास्क, वेळोवेळी सॅनिटायझर व शारीरिक अंतर ठेवण्याचे नियम पाळायलाच हवेत. मनपातील आरोग्य कर्मचारी, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी गेल्या एक वर्षापासून काम करीत असताना कुठे तरी संक्रमित होण्याची शक्यता आहे. असे असताना शहरातील काही नागरिक ज्या पद्धतीने वागत आहेत, ती पद्धत नक्कीच योग्य नाही. आमच्या कर्मचार्‍यांत खरोखरच थकवा जाणवू लागला आहे. सतत वाढणार्‍या सकारात्मक ताणतणावाखाली असताना शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णांचा ओघही आरोग्य सेवा मिळविण्यासाठी आपल्याकडे आहे. तेथील पायाभूत सुविधा इतक्या स्वयंपूर्ण नाहीत; परंतु आरोग्य सेवा मिळविणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. त्यानुसार ते मिळवीत आहेत.

सर्व जण आपल्या कुटुंबाची काळजी घेत असताना ज्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती हरवल्या आहेत, त्यांच्या वेदना लक्षात घ्यायला हव्यात. ज्यांनी त्यांच्याजवळच्या काही व्यक्ती हरवल्या आहेत, अशी काही कुटुंबे आहेत, ज्यांची मला माहिती आहे. एका कुटुंबात तीन सदस्य होते. कोविड सुरू होण्यापूर्वी आता त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य बाकी आहेत. त्यांना स्वत:ला प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे. जेव्हा त्सुनामी आपल्या कुटुंबीयांना किंवा प्रिय व्यक्तीला घेऊन जाते, तेव्हा काय परिस्थिती उद्भवते हे लक्षात घ्यायला हवे.

सर्वांना विनंती करण्यात येत आहे, की महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कोविडच्या त्रिसूत्रीचे अनुकरण करण्यास सांगितले किंवा अँटीजेन अथवा आरटीपीसीआरची चाचणी करून घ्यावी, अशी विनंती केली तर आमच्या कर्मचार्‍यांशी वाद घालू नका, तसेच सर्वांनी कोरोनासंदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, तसेच सामाजिक अंतर राखून लस घ्यायला हवी. लसीकरणासाठी रांगेत उभे राहण्यापूर्वी प्रथम कोरोनाची चाचणी करून घ्या, जेणेकरून आपण रांगेत उभे असताना आपल्यापासून कोणालाही संसर्ग होणार नाही.

मनपा आरोग्य विभागाच्या टीम गेल्या एक वर्षापासून काम करीत आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, कोरोना कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड हे बाधित झाले आहेत. कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, आमचे कर्मचारी तुमच्या सर्वांसाठी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. हे आमचे कर्तव्य असले, तरी सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त कैलास जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना केले आहे.Municipal Commissioner

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.