Mumbai Police | आता मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘वुमन सेफ्टी सेल’!

मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण (Saki Naka Rape and Murder Case) या काळजाला थरकाप करणा-या घटनेमुळे राज्याच्या पंचक्रोशीत खळबळ उडाली. या घटनेमुळे आख्ख्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकरणामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनेला अटकाव घालण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray government) कडक नियम करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईत मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आता प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमन सेफ्टी सेलची (Woman Safety Cell) स्थापना केली जाणार आहे. वुमन सेफ्टी सेल बरोबरच निर्भया पथक (Fearless squad) उपक्रम सुरू केले जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील महिला सुरक्षा त्याचबरोबर महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्हे, बाल अत्याचार प्रतिबंधक यांच्या अनुषंगाने तपास आणि कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व जिल्हे, आयुक्तालयनिहाय आढावा घेतला.या बैठकीनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक नवे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.त्या अनुषंगाने मुंबईत निर्भया पथक आणि सक्षम हे उपक्रम सुरू केले जाणार आहे.

तसंच प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमन सेफ्टी सेलची (Woman Safety Cell) स्थापना केली जाणार आहे. मोबाईल 5 या वाहनांला यापुढे निर्भया पथक संबोधित केले जाईल.प्रत्येक प्रादेशिक विभागाला 1 महिला सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि महिला पोलीस निरीक्षक (PI) असणार आहे.निर्भया पोलिसांची वेगळी नोंदवही असावी अशी सूचना देखील केल्या आहेत.

दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याने त्याच्या हद्दीतील महिला विरूद्ध होणारे गुन्ह्याच्या जागा शोधून काढाव्या. तसेच, मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale) यांनी मुंबई पोलिसांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत नुकतीच साकीनाका पोलीस ठाणे हददीत रात्रीच्या वेळी एकटया महिलेवर अत्याचाराची घटना घडलेली असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये, या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.याबाबत आदेश मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale) यांनी दिले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.