TRP racket टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश – मराठी चॅनलचे दोघे मालक अटकेत

मुंबई : गैर मार्गाने टीआरपी मिळवण्यासाठी कार्यरत असलेल्या दोघा मराठी चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याचे म्हटले जात आहे. बदनामी करून पैसे देऊन टीआरपीसोबत छेडछाड करण्यात आल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स या रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी केली जाणार आहे.TRP racket

फक्त मराठी” आणि “बॉक्स सिनेमा” या दोघा मराठी चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. बनावट टीआरपीचे रॅकेट मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकाने उघड केले आहे. घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याच्या प्रकरणात हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून रक्कम देण्यात आली होती. “फक्त मराठी”, “बॉक्स सिनेमा” आणि रिपब्लिक टीव्ही हे तीन चॅनेल आरोपीच्या घरात आहेत.

रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजावले जाणार आहेत. सहभागी असणाऱ्या सर्वांवर अटकेची टांगती तलवार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.

फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने या प्रकरणी तपास सुरु आहे. यात रिपब्लिक टिव्हीने देखील अशा पद्धतीने प्रकारे टीआरपी वाढवल्याचा संशय व्यक्त केला जत आहे. अन्य चॅनेलबाबतीत देखील चौकशी सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.

महाआघाडी सरकार आणि रिपब्लिक टिव्ही यांच्यातील सामना आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी बोलणाऱ्या अर्णबबद्दल आघाडीतील नेते आधीच चिडून होते. ए उद्धव, ए संजय राऊत कहाॅं छुपा है तू, अशी बडबड अर्णब करत होता. आता टीआरपीती अर्णबला घेरण्याची संधी मुंबई पोलिसांना पर्यायाने आघाडी सरकारला मिळाली आहे. अर्णब गोस्वामी विरोधात विधीमंडळात हक्कभंगाचाही ठराव करण्यात आला असून त्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.TRP racket

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.