कसारा घाटात अपघात, धुळे महापालिकेतील नगरसेवकासह तिघांचा जागीच मृत्यू

नाशिक :मुंबई – नाशिक महामार्गावर कसारा घाटाजवळ झालेल्या भीषण अपघातात धुळे महापालिकेतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने सदरचा अपघात झाला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.mumbai nashik highway  kasra accident three died dhule people 

 रात्री कार दुचाकी चालवतांना कारच्या लाईटचा  त्रास होतो, मग तुम्ही नाईट व्हिजन चष्मा वापरला पाहिजे, क्लिक करा नक्की वाचा !

या घटनेमध्ये सकाळच्या सुमाराला नाशिक-मुंबई महामार्गावरील शहापूर नजीक कार भरधाव वेगात असतानाच चालकाचे अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात ६ ते ७ वेळा गोलांड्या घेत कोसळली होती. या अपघातात नगसेवक कुमार नरोत्तम डियालानी (५७) यांच्यासह राजीव सुंदरदास भटीजा (६८), ललीतकुमार मनोहरलाल भारद्वाज (४७)  , या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रमेश कुकरेजा आणि वाहन चालक हे गंभीर जखमी झाले आहेत.mumbai nashik highway  kasra accident three died dhule people 

 हेल्मेट घेण्याचा विचार करताय का ? मग विचार कसला करता,क्लिक करा !

अपघाताची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल होवून या तिघांचे मृतदेह कार मधून काढून  शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमी रमेश कुकरेजा  यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतक नगरसेवक  कुमार नरोत्तम हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून पहिलीच टर्ममध्ये धुळे महापालिकेत निवडून आले होते. तर या पूर्वी त्यांचे वडील नरोत्तम डियालानी हे त्या परिसरातून नगरसेवक होते. कुमार नरोत्तम डियालानी हे मित्रासह उल्हासनगर येथील नातेवाईकांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघाले होते. हे स्विफ्ट डिझायर कारने पहाटेच्या सुमारास धुळ्यावरून निघाले होते.

mumbai nashik highway  kasra accident three died dhule people 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.