पिंपळगावाजवळ भीषण अपघात, ६ वऱ्हाडी जागीच ठार

नाशिक : नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगावजवळ एसटी बस आणि जीप (टाटाची क्रुझर) यांच्यात भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर  ९  जण जखमी झाले आहेत. महामार्गावर असलेल्या शिरवाडे फाट्याजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास दुर्घटना घडली.

या अपघातामध्ये चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात जीप दुभाजक ओलंडून नाशिककडून वडाळीभोईकडे येणार्‍या सटाणा आगाराच्या बस (एम एच १४, बीटी ४७१६) ला जोरदार धडक दिली. या धडकेत जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. जीपमधील सर्वजण सटाणा तालुक्यातील किकवारी खुर्द येथे लग्नासाठी चालले होते. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर पिंपळगाव बसवंत येथे उपचार सुरू आहेत.

चांदवड तालुक्यात दुसर्‍यांदा मोठा अपघात

चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे झालेल्या  क्रुझर व बसच्या अपघातात एकूण आठ जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले. या अपघाताने 7 जून रोजी तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव टप्पा येथ्लृे मिनी बस व वाळूच्या ट्रकमध्ये झालेल्या अपघाताची आठवण करून दिली. या अपघातात मिनी बसमधील 10 जण जागीच ठार तर 14 जण गंभीर जखमी झाले होते. चांदवड तालुक्यात 20 दिवसांच्या आत दोन भीषण अपघात होऊन प्रवाशांना जीव गमावण्याची दुर्दैवी परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मृतांची नावे

रत्ना राजेंद्र गांगुर्डे (45डांगसौंदाणेता. बागलाण)तेजश्री साहेबराव शिंदे (किकवारी ता. बागलाण)कृष्णाबाई बाळू शिंदे (किकवारी)धनुबाई केदा काकुळते (60,किकवारी)अशोक पोपट गांगुर्डे (जीपचा चालककळवण)सरस्वतीबाई  जगताप (वय 60किकवारी ता. बागलाण)सिद्धी विनायक मोरे (11रा. मुंजवाड ता. बागलाण) व शोभा संतोष पगारे (40रा. मुंजवाड ता. बागलाण) आदींचा मृतांमध्ये समावेश आहे.

जखमींची नावे

यश प्रकाश पगारे (8रा. मुंजवाड ता. बागलाण)सरला प्रकाश पगारे (36मुंजवाड ता. बागलाण)सुनंदा जगताप (50नाशिक),शंकर चिंधा काकुळते (50नाशिक),बाळासाहेब पंढरीनाथ्लृ शिंदे (50किकवारी ता. बागलाण)रिना शशिकांत जगताप (32,रा. नाशिक)केवळ सीताराम पवार (58,नाशिक)कल्पना कृष्णा शिंदे (40रा. कंधाणे ता. बागलाण)मोहिनी विनायक मोरे (50,मुंजवाड ता. बागलाण).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.