MSRTC Strike : नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ७० टक्के प्रतिसाद

नाशिक : राज्य भरात एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही पाहायला मिळाले. नाशिक जिल्ह्यात संप सुमारे ७० टक्के यशस्वी होतांना दिसला. msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

जिल्ह्यातील सटाणा, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, निफाड, मालेगाव आगारातुन काही बस सकाळी बाहेर पडल्या. तर नाशिक शहरातील मध्यवर्ती ठक्कर आणि मुंबई नाका बसस्थानकातून सकाळी काही लांब पल्लाच्या बस निघाल्या. दुपारनंतर मात्र बसवाहतुक पूर्णपणे बंद झाली.

जिल्ह्यात दररोज एकूण 2383 फेऱ्या होतात. यातील केवळ 562 फेऱ्या झाल्या. तर शहरात दररोज एसटी बसच्या 1089 फेऱ्या होतात. यातील फक्त 266 फेऱ्या झाल्या. सोबतच बहुतांश कर्मचारी वर्ग संपावर गेल्यामुळे कामकाज बंद पडले. msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

ग्रामीण भागात अजूनही वाहतूक मोठ्याप्रमाणात एसटीच्या माध्यमातूनच होते. त्यामुळे सर्व  व्यवहार ठप्प झाले. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर मोठा परिमाण झाला आहे. प्रवाश्यांची मोठी कोंडी झाली.

 

दुसरीकडे खासगी वाहतूकदरांनी प्रवाशी लुट सुरु केल्याचे दिसले. अनेक प्रवासी नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकात खोळंबले आहेत. कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नसल्यामुळे प्रवासी नाराज आहेत. msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

दरम्यान, हा संप कुठल्याही संघटनेचा नसून कर्मचाऱ्यांनी केलेला संप आहे. तसेच हा संप म्हणजे कर्मचाऱ्यांचा आक्रोश असल्याची प्रतिक्रिया इंटक या एसटी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे.

ग्रामीण नाशिक : MSRTC Strike : लासलगाव डेपोतील 200 कर्मचारी संपात सहभागी

दहावीचा निकाल : नाशिकमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दुःखी

msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

असे ताटकळले प्रवासी… नवीन सीबीएस आणि महामार्ग बस स्थानकावरील छायाचित्रे

msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

msrtc strike Increment agreement st samp 70percent successful Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.