महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठे व व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने दि. २४/०९/२०२० पासून लेखणी/अवजार बंद सह ठिय्या आंदोलन व दि. ०१ आक्टोबर २०२० पासून सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयीन काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे नाशिक विभागातील सर्व अनुदानित महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपआपल्याल्या महाविद्यालयात आज पासून आंदोलनास सुरुवात केलेली आहे. सदर आंदोलनात 100% कर्मचाऱ्यांचा सहभाग असून त्यामुळे सर्व महाविद्यालयांचे कामकाज ठप्प झालेले आहे. college and university
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- बारा व चोवीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना पूर्वीप्रमाणे त्वरित लागू करण्यात यावी तसेच दिनांक ०७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ चे आश्वासित प्रगती योजना रद्द करण्याच्या संदर्भातील शासन निर्णय (GR) त्वरित रद्द करण्यात यावा.
- बारा व चोवीस वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन त्वरित सुरू करण्यात यावे.
- सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे त्वरित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
आशा व इतर सर्व मागण्यांसाठी सर्व कर्मचारी आंदोलन करीत असून कोविड १९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघ, नाशिक विभाग, नाशिक college and university